साडीच्या दुकानातून होत होती गुटखा, तंबाखुची विक्री, पावणे आठ लाखांचा माल जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2020 14:49 IST2020-09-13T14:48:12+5:302020-09-13T14:49:57+5:30
शहर पोलिसांनी तंबाखुजन्य पदार्थांची विक्री करणार्यांविरुद्ध विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे गुटखा विक्रेते आता वेगवेगळ्या प्रकारे गुटखा विकताना दिसून येऊ लागले आहेत.

साडीच्या दुकानातून होत होती गुटखा, तंबाखुची विक्री, पावणे आठ लाखांचा माल जप्त
पुणे : अनलॉकमध्ये सर्व प्रकारची दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली़ असे असताना साडीच्या दुकानात साडीची विक्री करण्याऐवजी चक्क गुटखा, तंबाखु, सिगारेटची विक्री केली जात होती. गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने हा प्रकार उघडकीस आणला. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक करुन दुकानातील ७ लाख ८१ हजार रुपयांचा माल जप्त केला आहे.
विमलकुमार सुखराज जैन (वय ४५, रा. त्रिमुर्ती पॅलसे, नर्हेगाव) असे अटक केलेल्या दुकानदाराचे नाव आहे. हा प्रकार नर्हे येथील मातोश्री
हाईटसमधील भोला साडी सेंटरमध्ये सुरु होता. शहर पोलिसांनी तंबाखुजन्य पदार्थांची विक्री करणार्यांविरुद्ध विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे गुटखा विक्रेते आता वेगवेगळ्या प्रकारे गुटखा विकताना दिसून येऊ लागले आहेत. अमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय टिकोळे हे आपल्या सहकाऱ्यांसह गस्त घालत असताना त्यांना साडीच्या दुकानात तंबाखुजन्य पदार्थांची विक्री केली जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, उपायुक्त बच्चनसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक टिकोळे, साबळे, ढेमे, दळवी यांच्या पथकाने भोला साडी सेंटरवर छापा घातला. त्यावेळी दुकानात गुटखा, सिगारेट, पान पान मसाला यांचा ७ लाख ८१ हजार ८२५ रुपयांचा साठा आढळून आला.
पान दुकानातून गुटखा जप्त
नाना पेठेतील अंदाज पान मर्चंट या दुकानातून पोलिसांनी १८ हजार ८४८ रुपयांचा गुटखा व तंबाखुजन्य पदार्थ जप्त केले आहेत़ याप्रकरणी सत्तार
रेहमान अत्तार (वय ४३, रा़ गणेश पेठ) याला अटक केली आहे.