शहरं
Join us  
Trending Stories
1
'माझ्या मित्राचे स्वागत करुन आनंद झाला', पीएम मोदी अन् पुतिन यांचा पुन्हा एकाच कारने प्रवास
2
पुतिन भारतात दाखल, पंतप्रधान मोदींकडून स्वागत; शिखर परिषदेकडे संपूर्ण जगाचे बारकाईने लक्ष  
3
“राहुल गांधींची विधाने बेजबाबदारपणाची”; भाजपाचा पलटवार, पुतिन भेटीवरून केली होती टीका
4
IPL 2026 : कोट्यवधीचं पॅकेज हवं; पण पूर्णवेळ काम नको! ५ क्रिकेटरपैकी एकाने काढलाय लग्नाचा मुहूर्त
5
पुतिन भारतात पोहोचण्यापूर्वीच मोठी बातमी येऊन धडकली, 2 अब्ज डॉलरच्या डीलवर शिक्कामोर्तब; पाक-चीनची झोप उडणार!
6
रेल्वेत 1.20 लाखांहून अधिक पदांची भरती; रेल्वेमंत्र्यांनी लोकसभेत दिली महत्वाची माहिती...
7
विराट कोहली, रोहित शर्मा दोघेही 'दादा' क्रिकेटर, त्यांच्या नादाला लागाल तर...- रवी शास्त्री
8
प्रेयसीला घरी भेटायला गेला अन् रंगेहाथ पकडला!अर्ध्यातच सोडून मित्रांनी पळ काढला; मग जे घडलं त्याची कुणी कल्पनाही केली नसेल!
9
पुतिन यांचे विमान भारतीय हवाई हद्दीत; रशियाची लढाऊ विमाने माघारी फिरली...
10
AUS vs ENG Ashes Test : एकाच वेळी दोघे कॅचसाठी झेपावले; धडक झाली, पण कॅरीनं चेंडू पकडला अन्...
11
170 अब्ज डॉलर्सचे व्हॅल्युएशन, 38000 कोटी उभारण्याची तयारी; कधी येणार Jio IPO?
12
डॉ. गौरी पालवे-गर्जे मृत्यू प्रकरण: आई-वडील CM फडणवीसांना भेटले; उच्चस्तरीय चौकशीची मागणी
13
आता घ्यायची तर १०० टक्के इथेनॉलवर चालणारीच कार घ्या...; गडकरी बसले, म्हणाले '२५ रुपये लीटर...'
14
मुंबई-गोवा महामार्गाचा मुद्दा पुन्हा संसदेत, मविआ खासदारांचे प्रश्न; नितीन गडकरी म्हणाले...
15
दोन दशकांची मैत्री; पीएम मोदी आणि पुतिन यांची पहिली भेट कधी झालेली? पाहा फोटो...
16
“१७५ जागा आल्या, तर भाजपाने बेईमानी करून निवडणुका जिंकल्या हे सिद्ध होईल”; कुणी केला दावा?
17
काहींना टबमध्ये बुडवलं तर काहींना...; 'सायको काकी'ची थरकाप उडवणारी मोडस ऑपरेंडी
18
१० टोलनाक्यांवर नवीन टोल प्रणाली सुरु; चाचणीनंतर वर्षभरात देशभर...; गडकरींची लोकसभेला माहिती
19
आता 'या' राज्यात महिलांच्या खात्यात 2100 नाही, थेट 6300 रुपये जमा होणार! सरकारचा मोठा निर्णय, खुद्द मुख्यमंत्र्यांनीच सांगितला नवा 'प्लॅन'
20
प्रेमाच्या नादात दोन मुलांच्या आईचं 'कांड', पतीला दिला धोका; बहिणीचा संसार, सुरू होण्याआधीच मोडला!
Daily Top 2Weekly Top 5

Radhika Yadav Case: "आत्मसन्मानाला ठेच, मी माझ्या मुलीची हत्या केली..."; टेनिसपटू राधिका यादवच्या वडिलांची कबुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2025 13:02 IST

Radhika Yadav Murder Case: टेनिसपटू राधिका यादवच्या हत्येप्रकरणी न्यायालयात सादर करण्यात आलेल्या आरोपपत्रात एक मोठा खुलासा झाला आहे.

Radhika Yadav Murder Case: गुरुग्राममधील टेनिसपटू राधिका यादवच्या हत्येप्रकरणी न्यायालयात सादर करण्यात आलेल्या आरोपपत्रात एक मोठा खुलासा झाला आहे. २५४ पानांच्या आरोपपत्रात राधिकाचे वडील दीपक यादव हे एकमेव आरोपी आहेत. आरोपपत्रानुसार, दीपक यादवने आत्मसन्मानाला ठेच लागल्याने आपली मुलगी राधिकाची हत्या केली.

पोलीस तपासात असं समोर आलं की, दीपक यादवने आपल्या मुलीवर तीन गोळ्या झाडल्या, ज्यामुळे तिचा मृत्यू झाला. त्याने कबूल केलं की गावकरी त्याला त्याच्या मुलीच्या कमाईवरून चिडवायचे आणि तिच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करायचे. यामुळे त्याच्या आत्मसन्मानाला ठेच लागली, दुखावला गेला, म्हणूनच त्याने आपल्या मुलीची हत्या केली.

तपासात असंही समोर आलं की, वडील आणि मुलीमध्ये दीर्घकाळापासून तणाव होता. दीपक अनेकदा राधिकाला बाहेर जाण्यापासून किंवा कोचिंग क्लासेसमध्ये जाण्यापासून रोखत असे, ज्यामुळे दोघांमध्ये संघर्ष होत असे. राधिकाच्या वडिलांनी तिला तिचं इन्स्टाग्राम अकाउंट डिलीट करण्यास सांगितलं होतं.

या प्रकरणात पोलिसांनी ३५ साक्षीदारांचे जबाब नोंदवले आहेत. या जबाबांमध्ये कुटुंबातील सदस्य, शेजारी आणि इतर संशयितांकडून मिळालेल्या माहितीचा समावेश आहे. राधिका तिच्या अभ्यासात आणि खेळात खूप सक्रिय होती आणि तिला कोचिंग आणि स्पर्धांमध्ये सहभागी होण्यापासून रोखले जात होते. या घटनेने गुरुग्राममध्ये खळबळ उडाली.

राधिका यादव ही एक प्रतिभावान टेनिस खेळाडू होती जिने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेतला होता. पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले आणि आरोपीला अटक केली, न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आणि पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Tennis Player Radhika Yadav: Father Confesses to Honor Killing

Web Summary : Radhika Yadav's father confessed to killing her, citing shame over her earnings and alleged character flaws. He shot her three times following disputes over her career and social media use. Police investigation revealed long-standing tension between them.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकDeathमृत्यू