शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

माता न तू वैरिणी! नोकरी गेल्याने रागाच्या भरात जन्मदात्या आईनेच केली 3 वर्षांच्या लेकीची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2021 16:16 IST

Crime News : एका निर्दयी आईने रागाच्या भरात आपल्या तीन वर्षांच्या मुलीचा जीव घेतला. या प्रकरणी महिलेला अटक करण्यात आली आहे.

गुरुग्राम - देशात अनेक धक्कादायक घटना घडत आहेत. याच दरम्यान नात्याला काळीमा फासणारी एक घटना घडली आहे. नोकरी गेल्याने रागाच्या भरात तीन वर्षांच्या मुलीची जन्मदात्या आईनेच हत्या केल्याची घटना समोर आली आहे. हरियाणातील साढराणा येथील गणपती नगर कॉलनीत ही संतापजनक घटना घडली. एका निर्दयी आईने रागाच्या भरात आपल्या तीन वर्षांच्या मुलीचा जीव घेतला. या प्रकरणी महिलेला अटक करण्यात आली आहे. सोमवारी रात्री रुग्णालयामधून सोडल्यानंतर पोलिसांनी तिला अटक केली. त्यानंतर तिला कोर्टासमोर हजर करण्यात आले. 

महिलेची रवानगी भोंडसी तुरुंगात करण्यात आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक केल्यानंतर महिलेकडे चौकशी करण्यात आली. या चौकशीत तिने सर्व प्रकार सांगितला. ती एका खासगी रुग्णालयात नोकरी करत होती. जवळपास तीन महिन्यांपूर्वी तिची नोकरी गेली. तेव्हापासून ती घरीच होती. नोकरी गमावल्यानंतर तिची खूप चीडचीड व्हायची. किरकोळ गोष्टींवरून पतीसोबत तिचे वाद व्हायचे. तिला प्रचंड राग यायचा.

रागाच्या भरात महिलेने टोकाचे पाऊल उचलले

पतीच्या पगारावर घर चालणे कठीण झाले होते. रागाच्या भरात तिने टोकाचे पाऊल उचलले. आपल्याच पोटच्या तीन वर्षांच्या मुलीची तिने गळा आवळून हत्या केली. ही घटना शनिवारी रात्री बाराच्या सुमारास उघडकीस आली. राजस्थानच्या भरतपूरमधील मूळ रहिवासी असलेला प्रदीप सध्या गणपती नगर कॉलनीत राहतो. सेक्टर 33 मध्ये एका कंपनीत तो नोकरीला आहे. शनिवारी दुपारी पावणेदोन वाजताच्या सुमारास कंपनीत कामासाठी गेला होता. रात्री उशिरा बारा वाजता तो घरी परतला. त्यावेळी गेट आतून बंद होता. बराच वेळ वाट बघितल्यानंतर त्याने गेटला जोरात धक्का दिला आणि तो उघडला.

मुलीचा गळा आवळून केली हत्या

घरात गेला असता, पत्नी अत्यवस्थ होती. तर पलंगावर तिची तीन वर्षांची मुलगी बेशुद्धावस्थेत पडली होती. दोघींनाही रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्यात आले. तिथे मुलीला डॉक्टरांनी मृत घोषित केले. महिलेवर उपचार सुरू होते. मुलीचा गळा आवळून तिची हत्या करण्यात आल्याचे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाले आहे. महिलेला रुग्णालयातून सोडण्यात आल्यानंतर तिला अटक केली असून कोर्टात हजर केले. पोलिसांनी या प्रकरणाची अधिक चौकशी सुरू केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस