काळ्या हरणांची शिकार करणाऱ्यांसोबत पोलिसांची चकमक; गोळीबारात SI सह 3 पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2022 09:06 AM2022-05-14T09:06:59+5:302022-05-14T09:31:35+5:30

मध्य प्रदेशातील गुना येथे पोलीस आणि काळ्या हरणांची शिकार करणारे शिकारी, यांच्यात झालेल्या चकमकीत तीन पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू....

Guna poachers allegedly attacked on police team three policemen, including SI, were killed in the firing | काळ्या हरणांची शिकार करणाऱ्यांसोबत पोलिसांची चकमक; गोळीबारात SI सह 3 पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू

काळ्या हरणांची शिकार करणाऱ्यांसोबत पोलिसांची चकमक; गोळीबारात SI सह 3 पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू

Next

मध्य प्रदेशातील गुना येथे पोलीस आणि काळ्या हरणांची शिकार करणारे शिकारी, यांच्यात झालेल्या चकमकीत तीन पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये SI राजकुमार जाटव, कॉन्स्टेबल नीरज भार्गव आणि कॉन्स्टेबल संतराम यांचा समावेश आहे. हे शिकारी शुक्रवारी रात्री उशिरा मारलेले काळे हरीण घेऊन जात असताना, ही चकमक उडाली. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी सकाळी 9.30 वाजता बैठक बोलावण्यात आली आहे.

यासंदर्भात बोलताना मध्यप्रदेशचे गृह मंत्री नरोत्तम मिश्रा म्हणाले, गुनाजळव गुन्हेगारांच्या गोळीबारात तीन पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी, गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्यात येईल. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान हे स्वतः या घटनेवर लक्ष ठेवून आहेत.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. बैठकीत गृहमंत्री नरोत्तम मिश्रा, मुख्य सचिव, डीजीपी आणि एडीजी यांच्यासह काही वरिष्ठ पोलीस अधिकाहीही उपस्थित राहणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, घटनास्थळावरून हरणांची चार डोकी, डोके नसलेली दोन हरिण आणि एका मोर पक्ष्याचा मृतदेह जप्त करण्यात आला आहे.

Web Title: Guna poachers allegedly attacked on police team three policemen, including SI, were killed in the firing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app