अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी गुजराती युवकाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2018 19:42 IST2018-10-04T19:41:52+5:302018-10-04T19:42:39+5:30
आज पहाटे ही कारवाई करण्यात आली. त्याच्याकडून १ लाख ३० हजार रुपये किंमतीचा अमली पदार्थ जप्त करण्यात आला.

अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी गुजराती युवकाला अटक
म्हापसा - राज्यातील पर्यटन हंगाम सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी मूळ गुजरात वडोदरा शहरातील प्रणव पटेल (vy २९) या युवकाला बेकायदेशीरपणे अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी कळंगुट पोलिसांनी अटक केली आहे. आज पहाटे ही कारवाई करण्यात आली. त्याच्याकडून १ लाख ३० हजार रुपये किंमतीचा अमली पदार्थ जप्त करण्यात आला.
निरीक्षक जिवबा दळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार हा युवक सेंट अॅन्थोनी चॅपल गौरावाडा येथे अमली पदार्थाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळताच त्याला अटक करण्यासाठी सापळा रचण्यात आला. त्यासाठी पोलिसांच्या पथकाची सुद्धा स्थापना करण्यात आली. सदर युवका संबंधीत स्थळी दाखल होताच त्याला साध्या वेषातील पोलिसांनी घेरुन नंतर ताब्यात घेतले. त्याची तपासणी केली असता त्याच्याजवळ १ लाख रुपये किंमतीचा चरस आणि ३० हजार रुपये किंमतीचा कोकेन सापडले. त्याला पोलीस स्थानकात आणून त्याच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रजीत मांद्रेकर करीत आहेत. ही कारवाई उत्तर गोव्याच्या अधीक्षक चंदन चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपअधीक्षक किरण पौडवाल यांच्या देखरेखीखाली करण्यात आली.