तरूणीने डायरीमध्ये लिहिलं तिच्यावर रेप झाला, मग बाहेर जाते सांगून रेल्वेच्या बोगीत केली आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2021 17:41 IST2021-11-13T17:33:34+5:302021-11-13T17:41:50+5:30

Gujarat Rape News : पोलिसांना तिच्या मृतदेहाजवळ मोबाइल फोनही सापडला होता. जेव्हा पोलिसांनी मोबाइल चेक केला तर समजलं की, तरूणी गुजरातच्या नवसारीमधील आहे.

Gujarat : Valsad Navsari 19 year girl rape by 2 rickshaw puller on diwali | तरूणीने डायरीमध्ये लिहिलं तिच्यावर रेप झाला, मग बाहेर जाते सांगून रेल्वेच्या बोगीत केली आत्महत्या

तरूणीने डायरीमध्ये लिहिलं तिच्यावर रेप झाला, मग बाहेर जाते सांगून रेल्वेच्या बोगीत केली आत्महत्या

Gujarat Rape News : दिवाळीपासून गुजरातमध्ये सतत बलात्काराच्या घटना समोर येत आहेत. अशीच एक घटना वलसाडमधूनही समोर आली आहे. इथे दिवाळीच्या दिवशी सफाई कर्मचारी ट्रेनच्या डब्यात साफ सफाई करत होते. तेव्हाच त्यांना ट्रेनच्या अप्पर बर्थला एका १९ वर्षीय तरूणीचा मृतदेह लटकलेला दिसला.

पोलिसांना तिच्या मृतदेहाजवळ मोबाइल फोनही सापडला होता. जेव्हा पोलिसांनी मोबाइल चेक केला तर समजलं की, तरूणी गुजरातच्या नवसारीमधील आहे. गुजरात रेल्वे पोलिसांना चौकशी दरम्यान एक डायरीही सापडली होती. ज्यात तरूणीने लिहिले  की, आत्महत्येच्या दोन दिवसाआधी ते रात्रीच्या वेळी वडोदरामध्ये त्या ठिकाणी जात होती, जिथे ती भाड्याने  राहत होती. तेव्हाच दोन रिक्षावाल्यांनी तिचं अपहरण केलं. नंतर तिला वडोदरा वॅक्सीन ग्राउंडला नेऊन तिच्यावर रेप केला.

ज्यानंतर एका बसवाल्याने तिची मदत केली आणि तिला घरी सोडलं. दोन दिवसांनंतर तरूणीने घरातील लोकांना सांगितलं की, ती कुणालातरी भेटायला वलसाडला जात आहे. तिने आई-वडिलांना रेपबाबत काहीच सांगितलं नाही. त्यानंतर गुजरात क्वीन ट्रेनमध्ये सकाळी तिचा मृतदेह आढळून आला. ही ट्रेन वलसाडमध्ये रिकामी होते, त्यानंतर यार्डमध्ये जाते.

जेव्हा या ट्रेनची स्वच्छता करण्यासाठी सकाळी कर्मचारी आले तेव्हा त्यांना तरूणीचा मृतदेह आढळून आला. सध्या पोलीस तरूणीची मदत करणाऱ्या बस ड्रायव्हरला शोधत आहेत आणि सोबतच तिच्यावर रेप करणाऱ्या ऱिक्षावाल्यांचाही शोध घेत आहेत.

रेपच्या या घटनेबाबत तरूणीच्या कुटुंबियांना काहीच माहिती नव्हती. तरूणी नवसारीची राहणारी आहे. ती वडोदरा येथील यूनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेण्यासोबतच पार्ट टाइम एका संस्थेत फेलोशिपही करत होती. दिवाळीच्या दिवशी ती तिच्या रूमवर जात होती. तेव्हाच तिच्यासोबत रेपची घटना घडली.
 

Web Title: Gujarat : Valsad Navsari 19 year girl rape by 2 rickshaw puller on diwali