साडे सात लाखाचे खाद्य तेल लांबविणारी गुजरातची टोळी जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2021 07:24 PM2021-01-03T19:24:45+5:302021-01-03T19:25:16+5:30

Crime News : आता या गुन्ह्याचा पुढील तपास वरणगावचे सहायक निरीक्षक संदीपकुमार बोरसे करीत आहे.

Gujarat gang nabs Rs 7.5 lakh worth of edible oil | साडे सात लाखाचे खाद्य तेल लांबविणारी गुजरातची टोळी जेरबंद

साडे सात लाखाचे खाद्य तेल लांबविणारी गुजरातची टोळी जेरबंद

Next
ठळक मुद्देइद्रीस मोहम्मद कालू (३८), मोहम्मद बशीर शेख (३५) व शोएब हुसेन जभा (३७) सर्व रा.गोध्रा, गुजरात या तिघांना अटक करण्यात आली आहे.

जळगाव : महामार्गावर लावलेल्या ट्रक व त्यातील साडे सात लाख रुपये किमतीचे खाद्य तेल लांबविणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पर्दाफाश केला असून इद्रीस मोहम्मद कालू (३८), मोहम्मद बशीर शेख (३५) व शोएब हुसेन जभा (३७) सर्व रा.गोध्रा, गुजरात या तिघांना अटक करण्यात आली आहे.


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ डिसेंबर २०२० रोजी सायंकाळी वरणगाव येथे नागपूर महामार्गावर खाद्य तेल भरलेला ट्रक (क्र.एम.एच.१९सी.वाय.६००२) लावण्यात आलेला होता. त्यात ७ लाख ३७ हजार ३४५ रुपये किमतीचा तेलाचा साठा होता. हा ट्रक चोरट्यांनी मध्यरात्री लांबविला होता. याप्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे व अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी या गुन्ह्याचा समांतर तपास करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखा व वरणगाव पोलिसांना दिले होते. दोन्ही यंत्रणेकडून तपास सुरु असतानाच ट्रक व तेल चोरणारे संशयित शिरपूर-चोपडा रस्त्यावर आणखी गुन्हा करण्याच्या तयारीत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी सहायक पोलीस निरीक्षक स्वप्नील नाईक, सहायक फौजदार राजेंद्र का.पाटील, अशरफ शेख, दादाभाऊ पाटील व दीपक पाटील यांचे पथक रविवारी सकाळी रवाना केले. या पथकाने सापळा रचून वर्णन व गुप्त माहितीच्या आधारावर तिघांना ताब्यात घेतले. त्यांचे आधारकार्ड व इतर कागदपत्रांची तपासणी केल्यावर हे गुजरातचे असल्याचे निष्पन्न होऊन खात्री पटली. पोलीसी खाक्या दाखविल्यावर त्यांनी वरणगाव येथून ट्रक व तेल चोरल्याची कबुली देवून आणखी असाच गुन्हा करण्याच्या तयारीत असल्याचे मान्य केले. दरम्यान, तिघांना वरणगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. आता या गुन्ह्याचा पुढील तपास वरणगावचे सहायक निरीक्षक संदीपकुमार बोरसे करीत आहे.

 

Web Title: Gujarat gang nabs Rs 7.5 lakh worth of edible oil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.