पॉर्न फिल्म रॅकेटचे गुजरात कनेक्शन आले समोर; ४० वर्षीय व्यक्तीस अटक 

By पूनम अपराज | Published: February 10, 2021 06:58 PM2021-02-10T18:58:50+5:302021-02-10T19:00:11+5:30

Porn Film Racket : व्ही ट्रान्स्फरच्या माध्यमातून २ जीबी फाइल्स मोफत शेअर केल्या जाऊ शकतात. येथील डाटा सात दिवसांत आपोआप डिलिट होतो. म्हणूनच पॉर्न रॅकेटमधील लोकं लिंक शेअर करण्यासाठी व्ही ट्रान्सफरचा वापर करीत होती.

Gujarat connection of porn film racket came to the fore; 40-year-old man arrested | पॉर्न फिल्म रॅकेटचे गुजरात कनेक्शन आले समोर; ४० वर्षीय व्यक्तीस अटक 

पॉर्न फिल्म रॅकेटचे गुजरात कनेक्शन आले समोर; ४० वर्षीय व्यक्तीस अटक 

googlenewsNext
ठळक मुद्देपोलिसांच्या मालमत्ता कक्षाने तन्वीर हाश्मी या ४० वर्षीय युवकाला सुरत येथून बेड्या ठोकल्या आहेत.

पॉर्न फिल्म रॅकेटमध्ये दररोज नवनवीन धक्कादायक माहिती समोर येत आहे. काही दिवसांपासून पॉर्न फिल्म रॅकेटचा पर्दाफाश झाला असून कारवाईचा बडगा पोलिसांनी उचलला आहे. या पॉर्न रॅकेटचं गुजरात कनेक्शन उघडकीस आलं आहे. पोलिसांच्या मालमत्ता कक्षाने तन्वीर हाश्मी या ४० वर्षीय युवकाला सुरत येथून बेड्या ठोकल्या आहेत. मालमत्ता कक्षाने या प्रकरणात अटक केलेली ही नववी व्यक्ती आहे. 

तन्वीर हाश्मीला आज न्यायालयात हजर करण्यात आले.  पॉर्न फिल्म प्रॉडक्शनप्रकरणी गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाने अटक केलेल्या अभिनेत्री गहना वशिष्ठला एका व्हिडीओमागे लाखो रुपये मिळत होते. यात मध्यस्थ म्हणून काम करणाऱ्या उमेश कामतला मालमत्ता कक्षाने सोमवारी बेड्या ठोकल्या आहेत. सिने अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांचे पती राज कुंद्रा यांच्या विआन इंडस्ट्रीज लि. कंपनीचा तो व्यवस्थापकीय संचालक आहे. या सेक्स रॅकेटचं जाळे परदेशातही पसरल्याची माहिती समोर आली आहे. नोकरी गेल्यानंतर उमेश कामात पॉर्नच्या काळ्या धंद्यात शिरला. परदेशी ऍपला पॉर्न फिल्म विकून उमेश आणि गहना कोट्यवधी रुपये कमावत होते. 

अभिनेत्री गहना वशिष्ठला अटक, वेबसीरिजच्या नावाखाली अश्लिल व्हिडीओचे शूटींग

या प्रकरणात आता या मोठी नावं समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मालमत्ता कक्षाच्या चौकशीत समोर आलेल्या माहितीनुसार, पॉर्न व्हिडीओसाठी कामतने एक ॲप तयार केला होता. यावरून तो व्हिडीओ अपलोड करायचा. गहनाकड़ून आलेले व्हिडीओ कुठे व कसे शेअर करायचे यासाठी तो मध्यस्थ म्हणून काम पाहत होता. या प्रकरणातील ही सातवी अटक आहे. कामत हा विआन इंडस्ट्रीज कंपनीचा मॅनेजिंग डायरेक्टर आहे. जास्तीचे पैसे कमाविण्यासाठी तो यात सहभागी झाला. यात ‘विआन’चे काही कनेक्शन आहे का?, फंडिंग कोण करत होते? या दिशेनेही  तपास करीत आहेत. यात गरज पडल्यास राज कुंद्रा यांचीही चौकशी होऊ शकते. कामतला  १० तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. व्ही ट्रान्स्फरच्या माध्यमातून २ जीबी फाइल्स मोफत शेअर केल्या जाऊ शकतात. येथील डाटा सात दिवसांत आपोआप डिलिट होतो. म्हणूनच पॉर्न रॅकेटमधील लोकं लिंक शेअर करण्यासाठी व्ही ट्रान्सफरचा वापर करीत होती.

Web Title: Gujarat connection of porn film racket came to the fore; 40-year-old man arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.