शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

सलग ८२ तास क्रिकेट खेळणारा विक्रमवीर तुरुंगात, MSK प्रसादांची तक्रार पडली महागात

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2019 5:29 PM

बी नागराजूने एमबीए पूर्ण केलं असून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चमकण्याची त्याची इच्छा होती.

ठळक मुद्देनागराजूनं ट्रू-कॉलरवर स्वतःचा मोबाईल नंबर एमएसके प्रसाद या नावाने रजिस्टर केला होता. काही उद्योजकांना त्यानं जवळपास ५ लाख रुपयांना गंडा घातला.प्रसाद यांच्या तक्रारीनंतर, वेगाने तपास करत पोलिसांनी नागराजूला बेड्या ठोकल्या.

तीन वर्षांपूर्वी - म्हणजेच २०१६ मध्ये आंध्र प्रदेशच्या रणजी संघातील एक तरुण क्रिकेटपटू चांगलाच प्रकाशझोतात आला होता. सलग ८२ तास क्रिकेट खेळणाऱ्या या वीराचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंदवलं गेलं होतं. ते नाव होतं, बी नागराजू. हे नाव पुन्हा चर्चेत आलंय, पण यावेळी ते पराक्रमासाठी नव्हे, तर त्यानं केलेल्या 'प्रतापां'मुळे. बीसीसीआयचे निवड समितीचे प्रमुख एमएसके प्रसाद यांच्या नावाने अनेक उद्योगपतींची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी नागराजूला अटक केली आहे. 

नागराजूनं ट्रू-कॉलरवर स्वतःचा मोबाईल नंबर एमएसके प्रसाद या नावाने रजिस्टर केला होता. त्याला प्रसाद यांच्या आवाजाची हुबेहूब नक्कल करता येत होती. त्याचाच वापर करून नागराजूनं काही उद्योजकांना जवळपास ५ लाख रुपयांना गंडा घातला. आपल्या नावाचा कुणीतरी गैरवापर करत असल्याचं एमएसके प्रसाद यांच्या लक्षात येताच, त्यांनी २५ एप्रिल रोजी या संदर्भात विजयवाडा सायबर क्राइम पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर, वेगाने तपास करत पोलिसांनी नागराजूला बेड्या ठोकल्या.

     बी नागराजूने एमबीए पूर्ण केलं असून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चमकण्याची त्याची इच्छा होती. परंतु, झटपट पैसे कमावण्याचा हव्यास आणि लक्झरी लाइफस्टाइलच्या मोहापायी त्याला तुरुंगाची हवा खावी लागत आहे. अर्थात, नागराजूच्या अटकेची ही काही पहिलीच वेळ नाही. २०१६ मध्ये प्रकाशझोतात आल्यानंतर अनेक प्रायोजकांनी त्याच्याशी संपर्क साधला होता. परंतु, नागराजूनं त्यांनाही फसवलं होतं. त्याच्याविरुद्ध पहिली तक्रार एन वेणुगोपाल नावाच्या व्यक्तीनं केली होती. महेंद्रसिंग धोनीच्या नावाने क्रिकेट अ‍ॅकॅडमी सुरू करणार असल्याचं सांगून नागराजूनं २२,३०० रुपये उकळल्याचा दावा वेणुगोपाल यांनी केला होता. तेलुगू देसम पार्टीच्या एका मंत्र्याचा पीए असल्याचं सांगून त्यानं एका हॉस्पिटलकडून ६० लाख रुपये घेतले होते. या प्रकरणीही त्याला अटक करण्यात आली होती. 

दरम्यान, २०१६ मध्ये विशाखापट्टणम येथील एएस राजा कॉलेज ग्राउंडवर नागराजूनं ८२ तास फलंदाजी करून सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. त्यानं तब्बल २५ हजार चेंडूंचा सामना करून पुण्याच्या क्रिकेटपटूचा ५० तासांचा विक्रम मोडला होता. या विक्रमानंतर एका पुरस्कार सोहळ्यात नागराजू आणि एमएसके प्रसाद एकमेकांना भेटले होते. 

टॅग्स :BCCIबीसीसीआय