शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात हल्ल्याची तयारी, पाकिस्तानी कनेक्शन उघड; दहशतवादी बिलालच्या चौकशीतून धक्कादायक खुलासे
2
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
3
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
4
अजबच...! नकळत लग्न झालं...! अमेरिकन पॉप स्टारचा मलेशियन सुलतानशी 'निकाह', आता 'तलाक'ची मागणी; नेमकं प्रकरण काय?
5
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
6
७ वर्षांनंतर अनुष्का शर्मा करणार कमबॅक! 'चकदा एक्सप्रेस' OTTवर होणार रिलीज?
7
एका चपातीमध्ये किती कॅलरीज असतात, वजन कमी करण्यासाठी रात्री किती खाव्यात?
8
Crime:  "काका वारले, मुलंही सारखी आजारी पडतात", जादूटोण्याचा संशयातून जन्मदात्या आईची हत्या!
9
IND vs AUS:"कभी शेर को घास खाते हुए देखा है क्या?" सूर्या भाऊनं केली अभिषेकची थट्टा; व्हिडिओ व्हायरल
10
कतरिना कैफने ४२ व्या वर्षी दिला मुलाला जन्म, कशी आहे तब्येत? रुग्णालयाने शेअर केलं अपडेट
11
Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
12
Video: मराठी अभिनेत्रींनी केलं सोहम बांदेकरचं केळवण; आदेश-सुचित्रा बांदेकरांची होणारी सून कोण?
13
Gardening Tips: बटाट्याची सालं फेकू नका, रोपांसाठी ठरते सुपरफूड; वापर कसा करायचा ते पाहा 
14
'ती' फाइल आधी ३ वेळा माझ्याकडे आली होती; मी ती नाकारली- माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात
15
खळबळजनक! अनिलशी लग्न, आकाशशी अफेअर, नशेच्या गोळ्या...; काजलने नवऱ्याचा काढला काटा
16
“NDA म्हणजे पांडव, निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर कौरवांचा पराभव करा”; एकनाथ शिंदेंचे आवाहन
17
Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
18
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
19
Tarot Card: मध्यम फलदायी आठवडा, संयमाचा कस लागेल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
20
अजितदादांना शह देण्यासाठी पार्थ पवार प्रकरण काढलं गेलं का?; चंद्रकांत पाटील म्हणाले...

हजारो कोटींची GST फसवणूक; काय आहे इनपुट टॅक्स क्रेडिट? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2023 16:37 IST

GST Fraud News: इनपुट टॅक्स क्रेडिटद्वारे हजारो कोटींच्या फसवणुकीचा खुलासा झाला आहे.

What is Input Tax Credit: नोएडा पोलिसांनी हजारो कोटी रुपयांच्या GST फसवणुकीचा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी सध्या चार आरोपींना अटक करण्यात आले असून, आरोपी दररोज बनावट कंपन्यांमध्ये 80 लाख रुपयांचा व्यवसाय दाखवून परदेशातून जीएसटीचे 'इनपुट टॅक्स क्रेडिट' घेत असत, असा दावा पोलिसांकडून करण्यात आला. या प्रकरणात आठ आरोपींच्या बँक खात्यातील 3 कोटी रुपये गोठवण्यात आले आहेत. आरोपींनी गेल्या चार वर्षांपासून सरकारची हजारो कोटींची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. 

आतापर्यंत 25 जणांना अटक यापूर्वी जून महिन्यातही जीएसटीच्या माध्यमातून सरकारची हजारो कोटींची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला होता. या प्रकरणातही आरोपींनी हजारो बनावट कंपन्यांच्या नावाने बनावट पावत्या देऊन जीएसटीचे इनपुट टॅक्स क्रेडिट (आयटीसी) घेतले होते. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 25 जणांना अटक केली आहे. या घोटाळ्यातील रक्कम 10-15 हजार कोटींच्या आसपास असल्याचे बोलले जात आहे. आता अटक करण्यात आलेले आरोपी जुन्या टोळीशी संबंधित असल्याचेही तपासात समोर आले आहे. 

इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजे काय? हजारो कोटींची फसवणूक कशी केली?इनपुट टॅक्स क्रेडिट हे एक प्रकारचे क्रेडिट आहे, जे उत्पादकाला अंतिम उत्पादनावर कर भरताना वस्तू आणि सेवांच्या इनपुटवर कर भरण्यासाठी दिले जाते. उदाहरणार्थ, जर एखादा उत्पादक कच्च्या मालावर 10% GST भरतो आणि नंतर तो कच्चा माल वापरून उत्पादन करतो, तर तो उत्पादनावर 10% GST भरतो. आता तो कच्च्या मालावर भरलेल्या GST च्या क्रेडिटचा दावा करू शकतो, ज्याद्वारे त्याला फक्त 10% -10% = 0% GST भरावा लागेल.

इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) हा GST प्रणालीचा एक महत्त्वाचा भाग आहे. यामुळे व्यावसायिकांना त्यांच्याकडून खरेदी केलेल्या वस्तू आणि सेवांवर भरलेल्या कराचा संपूर्ण लाभ मिळण्याची खात्री होते. यामुळे व्यावसायिकांचा खर्च कमी होण्यास आणि त्यांच्यातील स्पर्धा वाढण्यास मदत होते. ITC साठी पात्र होण्यासाठी व्यावसायिकांना काही अटी पूर्ण करणे आवश्यक आहे. यातील पहिली अट म्हणजे जीएसटी अंतर्गत नोंदणी असावी. दुसरे म्हणजे, इनपुट टॅक्स क्रेडिटसाठी अर्ज करावा. तिसरी आणि अंतिम अट म्हणजे, इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) साठी आवश्यक कागदपत्रे प्रदान केली जावीत.

सरकारची कशी फसवणूक झाली?आरोपींनी आयटीसीच्या नावाखाली हजारो कोटींचा महसूल कसा लुटला? या संदर्भात पोलिसांनी चौकशीच्या आधारे सांगितले की, आरोपींकडून मिळालेल्या बनावट कंपन्यांच्या यादीत यातील बहुतांश कंपन्या लोखंड आणि प्लास्टिकच्या वस्तूंचा व्यवहार करत होत्या. भंगार, कपडे आणि खेळणी इत्यादींशी संबंधित कंपन्यांची नावेही या यादीत आहेत. वेगवेगळ्या लोकांचे पॅन चुकीच्या पद्धतीने वापरून हे आरोपींनी तयार केले आहे. या सर्व बनावट कंपन्यांचा व्यवसाय थायलंड, सिंगापूर, तैवान, फिलीपिन्स आणि व्हिएतनाम येथील असल्याचे आरोपींनी दाखवले आहे. या कंपन्यांचे आयईसी (इम्पोर्ट-एक्सपोर्ट कोड) दाखवून हे लोक सरकारची फसवणूक करत होते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीcyber crimeसायबर क्राइमGSTजीएसटीfraudधोकेबाजी