दोस्त दोस्त ना रहा! लग्नाच्या १५ दिवसांपूर्वीच मित्राच्या गर्लफ्रेंडला घेऊन ‘तो’ फरार झाला
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2021 09:38 IST2021-11-01T09:37:38+5:302021-11-01T09:38:13+5:30
अमितसोबत ब्रेक अप झाल्यानंतर युवती बादलच्या प्रेमात पडली. मागील ६ वर्षापासून बादल आणि युवतीचं प्रेम प्रकरण सुरू होतं

दोस्त दोस्त ना रहा! लग्नाच्या १५ दिवसांपूर्वीच मित्राच्या गर्लफ्रेंडला घेऊन ‘तो’ फरार झाला
जोधपूर – मैत्री म्हटलं की विश्वासाचं नातं. या विश्वासाला तडा गेला तर मैत्रीला काहीच अर्थ नाही. राजस्थानच्या जोधपूरमध्ये एक अजब प्रकरण समोर आलं आहे. याठिकाणी लग्नाच्या १५ दिवस आधी युवकाने मित्राच्या गर्लफ्रेंडला घेऊन पळून गेला. या प्रकाराची पोलिसांना माहिती लागताच त्यांनी युवक आणि युवतीला शोधून काढत दोघांच्या पालकांकडे सोपवण्यात आलं. घडलेला प्रकार ऐकून मित्रांसह कुटुंबीयांनाही धक्काच बसला.
जोधपूरच्या रातानाडा परिसरातील ही घटना आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, शनिवारी संध्याकाळी एका कुटुंबाने त्यांच्या घरातील मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती. नातेवाईकांनी तक्रारीत म्हटलं की, त्यांची मुलगी जी नर्सिंग करत होती. ती शुक्रवारपासून घरातून बेपत्ता आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला असता मुलगी पाबुपुराचा रहिवासी असलेल्या बादल नायक नावाच्या युवकासोबत लग्नासाठी पळून गेली होती. बादल आणि युवतीला पोलिसांनी शोधत चौकशी केली तेव्हा दोघंही लग्न करण्यासाठी घरातून पळाल्याचं त्यांनी सांगितले.
काय आहे प्रकरण?
बादल नायक हा त्याचा मित्र अमित याच्या गर्लफ्रेंडला घेऊन पळाला होता. अमितसोबत ब्रेक अप झाल्यानंतर युवती बादलच्या प्रेमात पडली. मागील ६ वर्षापासून बादल आणि युवतीचं प्रेम प्रकरण सुरू होतं. परंतु याच काळात बादलचं लग्न ठरलं. १४ नोव्हेंबरला बादलच्या कुटुंबीयांना लग्न धुमधडाक्यात करण्याची तयारी सुरू केली. रातनाडा पोलीस ठाण्याचे पोलीस एसआय भंवर सिंह यांनी सांगितले की, बादल याचं ज्या मुलीसोबत लग्न ठरलं होतं. त्या मुलीने बादलविरोधात पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दाखल केली. त्याचसोबत रागाच्या भरात होणाऱ्या नवरीनं पोलीस ठाण्यात येऊन बादलला कानशिलात लगावली. पोलिसांनी हे प्रकरण थंड करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी या प्रकरणात बादलविरोधात फसवणुकीचाही गुन्हा नोंदवला आहे.
बादल याचं लग्न ठरल्यानंतर त्याने युवतीसोबत पळून जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर युवती आणि बादलनं एकमेकांशी फोनवर संवाद साधत घरातून पळून लग्न करूया असं ठरवलं. बादल आणि युवती घरातून पळून लग्न करणार होते. परंतु शनिवार असल्याने त्यांना लग्न करता आलं नाही. युवतीच्या कुटुंबीयांनी बेपत्ता असल्याची तक्रार केल्यानंतर हा सगळा प्रकार समोर आला. त्यानंतर पोलिसांनी सर्च करत दोघांना ताब्यात घेतलं.