नवरी वाट पाहत राहिली पण वरात आलीच नाही; लग्नाच्या दिवशी नवरदेवाने केली १० लाखांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 10:40 IST2025-04-07T10:40:08+5:302025-04-07T10:40:42+5:30
नवरीच्या बाजूने सर्व तयारी झाली होती. नातेवाईकही लग्नासाठी घरी पोहोचले होते. घरामध्ये आनंदाचं वातावरण होतं.

नवरी वाट पाहत राहिली पण वरात आलीच नाही; लग्नाच्या दिवशी नवरदेवाने केली १० लाखांची मागणी
उत्तर प्रदेशातील फिरोजाबादमधील रसूलपूर पोलीस स्टेशनसमोरील कॉलनीत राहणाऱ्या एका मुलीचं लग्न कलावती शाळेजवळ राहणाऱ्या एका तरुणाशी ठरलं होतं. ठरल्यानुसार, लग्नाची वरात ६ एप्रिल रोजी येणार होती.
नवरीच्या बाजूने सर्व तयारी झाली होती. नातेवाईकही लग्नासाठी घरी पोहोचले होते. घरामध्ये आनंदाचं वातावरण होतं. रविवारी सकाळी नवरदेवाच्या वडिलांनी मुलीच्या वडिलांना फोन करून सांगितलं की, त्यांना मुलाच्या लग्नासाठी १० लाख रुपये रोख हवे आहेत नाहीतर ते लग्नाची वरात घेऊन येणार नाहीत.
मुलीच्या कुटुंबाने लाखो रुपये देण्यास असमर्थता दर्शविली. ते मुलाच्या घरी गेले आणि खूप विनवणी केली. प्रकरण इतकं गंभीर झालं की वराच्या बाजूच्या लोकांनी मुलीच्या कुटुंबातील सदस्यांना मारहाण केली.
नवरी वरात येण्याची वाट पाहत राहिली. नवरीच्या वडिलांचं म्हणणं आहे की, लग्नाची सर्व तयारी पूर्ण झाली होती. लोकांना सर्व माहित होतं पण आता ऐनवेळी लग्न मो़डल्याने सर्वकाही उद्ध्वस्त झालं. शेवटच्या क्षणी वराच्या कुटुंबाने १० लाख रुपयांची मागणी केली. एवढे पैसे देऊ शकत नाही असं सांगितलं. सध्या या घटनेची सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे.