श्रीनगरच्या बाजारात ग्रेनेड हल्ला; एकाचा मृत्यू तर १५ जण जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2019 15:11 IST2019-11-04T15:09:55+5:302019-11-04T15:11:00+5:30

सैन्य दल आणि पोलिसांकडून हल्ला घडवून आणणाऱ्या दहशतवाद्यांना शोधण्यासाठी संयुक्त मोहिम

Grenade attack in Srinagar market; 1 died, 15 people were injured | श्रीनगरच्या बाजारात ग्रेनेड हल्ला; एकाचा मृत्यू तर १५ जण जखमी 

श्रीनगरच्या बाजारात ग्रेनेड हल्ला; एकाचा मृत्यू तर १५ जण जखमी 

ठळक मुद्देश्रीनगरच्या मौलाना आझाद मार्गावरील बाजारात आज दुपारी झालेल्या या हल्ल्यात एकाचा मृत्यू सुरक्षेसाठी तैनात असलेल्या जवानांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला.गेल्या १५ दिवसांत दहशतवाद्यांनी केलेला हा दुसरा हल्ला आहे.

जम्मू-काश्मीर - जम्मू - काश्मीरमध्ये पुन्हा दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला आहे. श्रीनगरच्या मौलाना आझाद मार्गावरील बाजारात आज दुपारी झालेल्या या हल्ल्यात एकाचा मृत्यू तर १५ जण जखमी झाले आहेत. दहशतवाद्यांनी भरगर्दी असलेल्या बाजारात सुरक्षेसाठी तैनात असलेल्या जवानांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला.

सैन्य दल आणि पोलिसांकडून हल्ला घडवून आणणाऱ्या दहशतवाद्यांना शोधण्यासाठी संयुक्त मोहिम राबविण्यात आली आहे. गेल्या १५ दिवसांत दहशतवाद्यांनी केलेला हा दुसरा हल्ला आहे.

Web Title: Grenade attack in Srinagar market; 1 died, 15 people were injured