"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2025 17:08 IST2025-08-24T17:06:56+5:302025-08-24T17:08:11+5:30
उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथील निक्की हत्या प्रकरण सध्या चर्चेत आहे.

फोटो - आजतक
उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथील निक्की हत्या प्रकरण सध्या चर्चेत आहे. निक्कीला तिचा पती विपिनने हुंड्यासाठी जाळून मारलं. याच दरम्यान, आज तकने निक्कीच्या वडिलांशी आणि भावाशी संवाद साधला. यावेळी, निक्कीच्या वडिलांनी सांगितलं की, आरोपींना शिक्षा झाली पाहिजे. आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवला पाहिजे.
निक्कीचा भाऊ म्हणाला की, माझ्या वडिलांनी नुकतीच मर्सिडीज कार खरेदी केली आहे. विपिनची नजर त्या कारवर होती. विपिन मर्सिडीजचीही मागणी करत होता. यासोबतच ६० लाख रुपये रोख रक्कमही मागितली जात होती.
बायकोला जाळणाऱ्या नवऱ्याचा एन्काउंटर; पायाला लागली गोळी, पळून जाण्याचा करत होता प्रयत्न
निकीच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, विपिन आणि त्याच्या कुटुंबाने लग्नात स्कॉर्पिओची मागणी केली. त्यानंतर मी त्यांना स्कॉर्पिओ दिली. नंतर मी बुलेटही दिली. तरीही, विपिन आणि कुटुंबातील इतर सदस्यांकडून हुंडा मागितला जात होता. माझ्या मुलीवर सतत अत्याचार केले जात होते. विपिनचे दुसऱ्या मुलीशीही संबंध होते. अशा परिस्थितीत विपिन आणि त्याची आई मुलीला सतत त्रास देत होते.
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
मुलीनेही अनेकदा सांगितलं होतं की, तिला मारहाण झाली. अनेक वेळा पंचायतही बसली. विपिन, त्याचे वडील आणि आई यांना अटक करून कठोर शिक्षा द्यावी अशी माझी इच्छा आहे. जर कठोर शिक्षा झाली नाही तर आम्ही एसएसपी कार्यालयाबाहेर धरणे धरू. निक्कीला विपिनने मारहाण केली. त्यानंतर त्याने तिला जाळून मारलं. गंभीर अवस्थेत निक्कीला रुग्णालयात नेण्यात आलं. पण तिला वाचवता आलं नाही.
"हुंड्यात स्कॉर्पिओ, बुलेट दिली तरी माझ्या मुलीची हत्या, आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवा अन्यथा..."
आरोपींना अटक न झाल्याने कुटुंबातील सदस्यांनी मोर्चा काढला आणि अटकेची मागणी करत कासना पोलीस ठाण्याला घेराव घातला. यादरम्यान, कुटुंबाने सांगितलं होतं की आरोपींचा एन्काउंटर करा. निक्कीची बहीण कांचनच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी या प्रकरणात आरोपी पती विपिनसह एकूण चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात एका आरोपीला अटक करण्यात आली आहे आणि उर्वरित आरोपींनाही लवकरच अटक केली जाईल, असं पोलिसांनी म्हटलं आहे.