“हिंमत असेल तर गोळी मारुन दाखव” इतकचं ऐकताच डिलीवरी बॉयनं मालकाला गोळी मारली अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2021 15:55 IST2021-09-01T15:54:17+5:302021-09-01T15:55:14+5:30
प्रत्यक्षदर्शीच्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री स्विगी डिलीवरी बॉय चिकन बिरयाणी आणि पूरीभाजीची ऑर्डर घेण्यासाठी आला होता.

“हिंमत असेल तर गोळी मारुन दाखव” इतकचं ऐकताच डिलीवरी बॉयनं मालकाला गोळी मारली अन्...
नवी दिल्ली – हिंमत असेल तर गोळी मारुन दाखव, इतकचं ऐकताच स्विगी कंपनीच्या डिलीवरी बॉयनं पिस्तुल काढली आणि किचन मालकाला गोळी मारली. या घटनेत किचन मालकाचा मृत्यू झाला. ही घटना दिल्लीच्यानजीक ग्रेटर नोएडा येथील मित्रा सोसायटीमध्ये घडली आहे. घटनेच्या वेळी डिलीवरी बॉय ऑर्डर घेऊन जाण्यासाठी ऑनलाईन फूड डिलीवरी रेस्टॉरंटमध्ये आला होता. याठिकाणी भाजीची एक ऑर्डर देण्यास उशीर झाल्या कारणानं किचन कर्मचाऱ्यामध्ये आणि डिलीवरी बॉयमध्ये वाद झाला. हा वाद इतका टोकाला गेला की, किचन मालक हस्तक्षेप करण्यास गेला असता त्याला जीव गमवावा लागला.
या घटनेनंतर परिसरात खळबळ माजली आहे. एकीकडे रात्री ९ नंतर राज्यात रात्रीचा कर्फ्यू लागू करण्यात येतो त्यात रात्री १२.३० वाजता ही घटना घडली. त्यामुळे पोलिसांवर प्रश्नचिन्ह उभे केले जात आहेत. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली. त्यानंतर सीसीटीव्हीच्या मदतीनं पोलीस डिलीवरी बॉयचा शोध घेत आहेत. लवकरच आरोपीला पकडू असं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ग्रेटर नोएडाच्या मित्रा सोसायटीतील रहिवासी ३८ वर्षीय सुनील दादरी ऑनलाईन फूड झमझम नावानं रेस्टॉरंट चालवतात. मंगळवारी रात्री १२.१५ मिनिटांनी येथे काम करणारा कर्मचारी नारायण आणि स्विगी डिलीवरी बॉयमध्ये वाद झाला.
प्रत्यक्षदर्शीच्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री स्विगी डिलीवरी बॉय चिकन बिरयाणी आणि पूरीभाजीची ऑर्डर घेण्यासाठी आला होता. त्यावेळी चिकन बिरयाणी ऑर्डर त्याला मिळाली परंतु पुरीभाजीची ऑर्डर मिळण्यास उशीर झाला. त्यामुळे कर्मचारी नारायणला त्याने विचारणा केली. नशेत असणाऱ्या स्विगी डिलीवरी बॉयनं नोकराला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर तिथेच उपस्थित असणारे रेस्टॉरंट मालक सुनील मध्यस्थी करण्यासाठी गेले. तेव्हा नशेत असणाऱ्या डिलीवरी बॉयनं गोळी मारण्याची धमकी दिली. ते पाहताच मालक सुनीलनं हिंमत असेल तर गोळी मारुन दाखव असं म्हणताच डिलीवरी बॉयनं सुनीलच्या डोक्यात गोळी मारली त्यामुळे सुनील जागीच कोसळला. गोळी लागल्यानंतर नारायण आणि इतर कर्मचाऱ्यांनी सुनीलला जखमी अवस्थेत रुग्णालयात नेले परंतु त्याठिकाणी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
उत्तर प्रदेश: ग्रेटर नोएडा की मित्रा हाउसिंग सोसायटी में कल ऑर्डर में देरी होने को लेकर हुए विवाद में स्विगी डिलीवरी ब्वॉय ने रेस्टोरेंट मालिक की गोली मारकर हत्या की।
— ANI_HindiNews (@AHindinews) September 1, 2021
एडिशनल डीसीपी विशाल पांडेय ने बताया, "मामला दर्ज़ किया गया है और इस मामले में 3 टीमें लगाई गई हैं।" pic.twitter.com/NZtcnxFMv2
या घटनेबाबत डीसीपी विशाल पांडे म्हणाले की, ऑर्डर देण्यास उशीर झाल्यानं डिलीवरी बॉयनं रेस्टॉरंट मालकाच्या डोक्यात गोळी झाडली. त्यात त्यांचा मृत्यू झाला. घटनास्थळी असलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपीचा शोध सुरु आहे. लवकरच आम्ही आरोपीला अटक करू. मात्र या घटनेनंतर डिलीवरी बॉय कर्मचाऱ्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. डिलीवरी बॉयच्या आडून गुन्हेगार सक्रीय झालेत का? असा सवाल लोकांच्या मनात निर्माण झाला आहे.