भुजबळांना मोठा दिलासा, आता राज्याबाहेर जाऊ शकणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2018 18:10 IST2018-09-04T18:09:27+5:302018-09-04T18:10:07+5:30
बाहेर जाण्यापूर्वी त्यांना तपास अधिकाऱ्याला त्याची माहिती देणे बंधनकारक असेल असे उच्च न्यायालयाने स्पष्ट म्हटले आहे.

भुजबळांना मोठा दिलासा, आता राज्याबाहेर जाऊ शकणार
मुंबई - महाराष्ट्र सदन घोटाळा व इतर आर्थिक गैरव्यवहारांप्रकरणी जामीन मिळालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांना राज्याबाहेर जाण्यास उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. मात्र, बाहेर जाण्यापूर्वी त्यांना तपास अधिकाऱ्याला त्याची माहिती देणे बंधनकारक असेल असे उच्च न्यायालयाने स्पष्ट म्हटले आहे.
मनी लाँडरींग प्रकरणात जामीन मिळाल्यानंतरही छगन भुजबळ यांना राज्याबाहेर जाण्यास मनाई करण्यात आली होती. मात्र, राज्याबाहेर जाण्यास परवानगी मिळावी यासाठी उच्च न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला होता. त्यावर आज सुनावणी करताना न्यायालयाने अटींसह परवानगी दिली आहे. त्यामुळे भुजबळ यांना मोठा दिलासा मिळाला आहे.