मुलींचे मृतदेह कबरीतून काढून घर सजवले, कोण आहे हा 'इतिहासकार'?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2022 16:09 IST2022-01-09T15:07:21+5:302022-01-09T16:09:01+5:30
मॉस्कविनला रशियन पॅनेल कोडच्या कलम 244 अंतर्गत दोषी ठरविण्यात आले, ज्यामध्ये कबरे आणि मृतदेहांची विटंबना करण्यासाठी शिक्षेची तरतूद आहे.

मुलींचे मृतदेह कबरीतून काढून घर सजवले, कोण आहे हा 'इतिहासकार'?
ग्रेव्ह थीफ : रशियाच्या एका कुख्यात गुन्हेगाराने लग्न करण्यासाठी मानसिक संस्थेकडून सुटकेची मागणी केली आहे. हा माणूस स्मशानभूमीतून मुलींचे मृतदेह चोरून घरी घेऊन जायचा. मग तो त्यांना घरात बाहुल्यांच्या रूपात सजवत असे. त्याने 26 मुलींचे मृतदेह घरात ठेवले होते. अनातोली मॉस्कविन (Anatoly Moskvin)असे या माणसाचे नाव आहे आणि एकेकाळी तो इतिहासकार होता.
अनातोली मॉस्कविनने (Anatoly Moskvin) विनंती केली आहे की, त्याला रशियामधील मानसिक संस्थेतून सोडण्यात यावे जेणेकरून तो लग्न करू शकेल. डेली स्टारच्या वृत्तानुसार, ५५ वर्षीय मॉस्कविन हे रशियातील निझनी नोव्हगोरोड शहरातील रहिवासी आहेत. मॉस्कविनला नोव्हेंबर 2011 मध्ये अटक करण्यात आली होती. त्याच्यावर ३ ते १२ वयोगटातील २६ मुलींचे मृतदेह कबरीतून बाहेर काढल्याचा आरोप आहे. त्यानंतर पोलिसांनी त्याचा व्हिडिओही जारी केला. ज्यामध्ये हे मृतदेह सोफ्यावर ठेवण्यात आले होते.
मॉस्कविनला रशियन पॅनेल कोडच्या कलम 244 अंतर्गत दोषी ठरविण्यात आले, ज्यामध्ये कबरे आणि मृतदेहांची विटंबना करण्यासाठी शिक्षेची तरतूद आहे. मॉस्कविनला नंतर मनोचिकित्सकाकडे उपचारासाठी पाठवण्यात आले. अटकेनंतर दिलेल्या मुलाखतीतही त्याने आपल्या मुलांबद्दल सहानुभूती व्यक्त करण्याचा प्रयत्न केला होता. त्याचवेळी, त्याने असेही सांगितले होते की, त्याचा विश्वास आहे की, तो विज्ञान किंवा काळ्या जादूद्वारे त्यांचे जीवन परत आणू शकतो.