शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
2
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
3
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
4
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
5
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
6
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
7
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
8
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
9
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
10
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
11
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
12
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
13
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
14
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!
15
'टेस्ट चॅम्पियन' टेम्बा बवुमाचा चिमुरड्या लेकाला सोबत घेऊन 'विक्टरी वॉक', पाहा क्यूट Video
16
पुढील २४ तासांसाठी 'या' जिल्ह्यांना रेड तर ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; वीज पडून ८ जण दगावले
17
Bhushan Gavai: संविधान हा सतत विकसित होणारा दस्तऐवज- सरन्यायाधीश
18
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
19
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
20
Radhika Subramaniam : कमाल! भारताची पहिली AI ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर, देशाची सफर घडवणाऱ्या राधिकाला पाहिलंत का?

राज्याच्या माजी मंत्र्यांना खंडणी मागणाऱ्या आरोपी डॉक्टरला ' या ' कारणासाठी तात्पुरता जामीन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2020 17:44 IST

राजकीय जीवनातून उद्धवस्त करण्याची धमकी देऊन ३० कोटी रुपयांची खंडणी मागण्याच्या गुन्ह्यात डॉक्टराला अटक करण्यात आली होती.

ठळक मुद्देकोरोना बाधितांची सेवा करण्याची केली होती इच्छा व्यक्त

पुणे : राज्याचे तत्कालीन पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर आणि शेळी मेंढी विकास महामंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब दोडतल्ले यांना राजकीय जीवनातून उद्धवस्त करण्याची धमकी देऊन ३० कोटी रुपयांची खंडणी मागण्याच्या गुन्ह्यात मोक्काखाली गेली १ वर्षे येरवडा कारागृहात असलेल्या डॉक्टराला अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एन. सिरसीकर यांनी नुकताच २ महिन्यांचा तात्पुरता जामीन मंजूर केला आहे. मोक्काखाली येरवडा कारागृहात असलेल्या या डॉक्टराने ससून रुग्णालयातकोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळेहा जामीन मंजूर करण्यात आला आहे.डॉ. इंद्रकुमार देवराव भिसे (वय ५२, रा. शिरुर) असे या डॉक्टराचे नाव आहे. डॉ. भिसे यांना २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर ६० दिवसांसाठी जामीन मंजूर करण्यात आला आहे. न्यायालयाने जामीन मंजूर करताना काही अटी घातल्या आहेत. त्यात डॉक्टरांनी आठवड्यातील ५ दिवस डॉक्टर म्हणून ससून रुग्णालयात कोविड -१९ च्या रुग्णांवर उपचार करावेत. त्यांनी साक्षीदारांवर दबाव टाकू नये. या जामीनाची मुदत संपण्याअगोदर कारागृहात हजर रहावे. त्यावेळी त्याने ससून हॉस्पिटलच्या अधीक्षकांचे प्रमाणपत्र सादर करावे, अशा अटी घालण्यात आल्या आहेत.तत्कालीन मंत्री महादेव जानकर यांना फोन करुन तुमच्याविषयीच्या काही क्लिप्स आमच्याकडे आहेत. त्या माध्यमांपर्यंत पोहचवून तुमची बदनामी करु अशी धमकी दिली होती. ३० कोटी रुपयांच्या खंडणीतील पहिला हप्ता १५ कोटी रुपये स्वीकारताना बारामतीतील हॉटेल कृष्णसागरमध्ये आले असताना गेल्या वर्षी पोलिसांनी ५ जणांना पकडले होते. त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई केली होती.डॉ. भिसे यांनी वैद्यकीय कारणासाठी जामीन अर्ज दाखल केला होता. देशातील कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयाने कारागृहातील कैद्यांची संख्या कमी करण्यासाठी कमी शिक्षा असलेल्या कैद्यांना तात्पुरत्या जामीनावर सोडण्यास मंजूरी दिली. त्यानुसार काही हजार कैद्यांची कारागृहातून सुटका करण्यात आली आहे. मात्र, डॉ. भिसे यांच्यावर मोक्कासारखा गंभीर गुन्हा दाखल असल्याने त्यांची सुटका झाली नाही़ .

देशातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन डॉ. भिसे यांनी स्वत: कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी आपल्याला जामीन द्यावा, असा अर्ज न्यायालयाकडे केला होता. अतिरक्त सत्र न्यायाधीश शिरसीकर यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे  डॉ.भिसे यांचे म्हणणे ऐकून घेतले. ते खासगी हॉस्पिटलमध्ये गेली २० वर्षे स्त्रीरोगतज्ञ म्हणून प्रॅक्टिस करतात. त्यांचे पुण्यातील सदाशिव पेठेत घर आहे. ते पळून जाण्याची शक्यता नाही़ असे त्यांनी न्यायालयाला सांगितले.उच्च स्तरीय समितीच्या नियमावलीनुसार, डॉ. भिसे यांना जामीन मिळू शकत नाही़ पण कोरोना बाधित रुग्णांची सेवा करण्यासाठी त्याचा विचार होऊ शकतो,असे निरीक्षण न्यायालयाने नमूद केली. देशातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. सर्व वैद्यकीय विभागावर त्याचा मोठा ताण आला आहे. त्यामुळेशासनाने खासगी डॉक्टरांना शासकीय रुग्णालयात सेवा देण्याचे आवाहन केलेआहे. तसेच ससून रुग्णालयात सध्या १३६ खासगी डॉक्टर आपली सेवा देत असल्याचे न्यायालयाने सांगितले.  आरोपीला वैद्यकीय सेवेचा अनुभव असूनत्याचा सार्वजनिक आरोग्य विभागाला उपयोग होईल. हे सर्व पाहता डॉ. भिसेयांची ससून रुग्णालयात सेवा करण्याची इच्छा लक्षात घेऊन समाजाच्याहितासाठी त्यांना तात्पुरता जामीन देणे योग्य होईल, असे नमूद करीत त्याचा ६० दिवसांसाठी तात्पुरता जामीन मंजूर केला.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकdoctorडॉक्टरCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCourtन्यायालय