शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
3
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
4
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
5
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
6
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
7
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
8
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
9
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
10
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
11
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
12
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
13
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
14
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
15
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
16
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
17
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
18
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
19
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
20
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं

नातवाने आजोबांची केली हत्या अन् हातपाय साखळीने बांधून मृतदेह फेकला नाल्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2020 13:40 IST

Murder : याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गिरणारेजवळील धोंडेगावात राहणाऱ्या रघुनाथ श्रावण बेंडकुळे (70) या वृद्धाचा त्यांचा नातू किरण याने निर्घृणपणे खून केला.

ठळक मुद्देयाप्रकरणी पोलिसांनी संशयित नातू किरण निवृत्ती बेंडकुळे (23) यास अटक केली असून गुन्ह्यात वापरलेली मारुती ओमनी कार जप्त केली आहे.

नाशिक : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने आजोबांना घराबाहेर जाण्यास नातवाने शारीरिक, मानसिक त्रास वारंवार देत मंदिरात जाण्यापासून रोखल्याने आजोबांनी थेट पोलिसांकडे गाऱ्हाणे मांडले; याचा राग मनात धरुन नातवाने आजोबांचा चक्क खून करुन तोंडाला चिकटपट्टी लावून हातपाय बांधून मृतदेह चारचाकीतून शहरी भागातील एका नाल्यात फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी (दि.13) उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी संशयित नातू किरण निवृत्ती बेंडकुळे (23) यास अटक केली असून गुन्ह्यात वापरलेली मारुती ओमनी कार जप्त केली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गिरणारेजवळील धोंडेगावात राहणाऱ्या रघुनाथ श्रावण बेंडकुळे (70) या वृद्धाचा त्यांचा नातू किरण याने निर्घृणपणे खून केला. आजोबा वृद्ध असल्याने त्यांचे मानसिक संतुलन बिघडल्याचे सांगून वृद्ध रघुनाथ विनाकारण घराबाहेर किंवा मंदिरात जातात म्हणून त्यांना कित्येक दिवस नातू किरण हा लोखंडी साखळीने घरात बांधून ठेवत असल्याचा प्रकार तपासात समोर आला आहे. नातवाच्या त्रासाला कंटाळून रघुनाथ यांनी हरसूल पोलीस ठाण्यात जाऊन महिनाभरापूर्वी तक्रार दिली होती.आजोबांनी तक्रार केल्याचा राग अनावर झाल्याने संशयित आरोपी किरण याने गेल्या रविवारी रात्री आजोबा रघुनाथ यांना रात्री उशिरा घराबाहेर झोपलेले असतांना तोंडाला घट्ट चिकट पट्टी लावून तसेच हातापायाला लोखंडी साखळी बांधून त्यांना मारुती ओमनीत टाकून क्रमांक (एम एच 15 इबी 3919) गाडी धोंडेगाव मार्गे मखमलाबाद येथून आडगाव शिवारातील ओढा गावात असलेल्या नाल्याकडे आणली व तेथे मृतदेह नाल्यात फेकला.दुसऱ्या दिवशी ओढाच्या नाल्यात एका वृध्द इसमाचा मृतदेह पडलेला असल्याची माहिती आडगाव पोलिसांना मिळाली त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक इरफान खान यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, हवालदार सुरेश नरवाडे, दशरथ पागी, गणपत ढिकले, देविदास गायकवाड आदींनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह पाण्यातून बाहेर काढल्यानंतर हा प्रकार हा घातपाताचा असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.  पोलिसांनी त्या दृष्टीने तपास सुरू केला आणि पोलिसांच्या तपासाला यश आले वृद्ध इसमाचा खून झाल्याची खात्री पटली. आडगाव पोलिसांनी त्यानुसार सुरुवातीला अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करुन पुढे तपास सुरु ठेवला. असा झाला खुनाचा  उलगडा  धोंडेगावात राहणाऱ्या रघुनाथ बेंडकुळे यांचा खून केल्यानंतर नातू किरणयाने त्यांचा मृतदेह चारचाकीतून ओढा शिवारात असलेल्या नाल्यात फेकून दिला होता. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्यावर मृतदेहाचा फोटो काढून या इसमाला कोणी ओळखते का याबाबत माहिती जमा करण्याचे काम सुरू केले होते. इसमासा फोटो दाखविल्यानंतर एका जागरूक नागरिकाने ओळखून मयत व्यक्ती ही धोंडेगाव येथील असून त्यांचा खून हा त्याच्याच नातवाने केला असावा अशी गोपनीय माहिती आडगाव पोलिसांना दिली या माहितीनुसार पोलिसांनी संशयित आरोपी किरण याला चौकशीसाठी ताब्यात घेतले असता त्याने आजोबांचा खून केल्याची कबुली पोलिसांना दिली. याप्रकरणी किरणविरुद्ध पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवला आहे. 

टॅग्स :Murderखूनcorona virusकोरोना वायरस बातम्याNashikनाशिकPoliceपोलिसArrestअटक