बापरे! आजी आजोबांनी केले अश्लील चाळे अन् लावले अल्पवयीन मुलीला जबदस्तीने बघायला
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2020 15:55 IST2020-08-07T15:49:47+5:302020-08-07T15:55:25+5:30
याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात आजी, आजोबा आणि मावशीच्या पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा माळशिरस तालुक्यातील वेळापूर येथे वर्ग करण्यात आला आहे.

बापरे! आजी आजोबांनी केले अश्लील चाळे अन् लावले अल्पवयीन मुलीला जबदस्तीने बघायला
पिंपरी : अल्पवयीन मुलीसमोर आजी आणि आजोबा यांनी अश्लील चाळे करुन एका अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने बघायला लावून ते बघितल्यास मारहाण व शिवीगाळ केली. तर त्या पीडीत मुलीच्य मावशीच्या पतीने पीडीतेवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात आजी, आजोबा आणि मावशीच्या पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा माळशिरस तालुक्यातील वेळापूर येथे वर्ग करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 2014 पासून 2020 पर्यंत वेळापूर, पंचशिल नगर व मसवड येथे घडली. फिर्यादी यांची सख्खी आजी व आजोबा यांनी फिर्यादीच्या समोरच शाररीक संंबंध प्रस्थापित केले. व ते पाहण्यास फिर्यादीस बळजबरी केली. याला फिर्यादीने नकार दिल्यानंतर तिला मारहाण व शिवीगाळ केली. तसेच पीडीत मुलीचे आजोबा यांनी पीडीत मुलीसोबत शाररीक अत्याचार केले. फिर्यादीने याविषयी आजीला सांगितले असता तिने याकडे दुर्लक्ष केले. तसेच फिर्यादीच्या मावशीचा पती याने पीडितेला गावाला नेऊन तिच्यासोबत बळजबरीने शारीरिक संबंध ठेवल्याने गुन्हा दाखल केल्याचे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
...चांगला मेसेज गेला नाही; बिहार पोलीस अधिकाऱ्याला क्वारंटाईन केल्याबद्दल SC ने कान खेचले!
Disha Salian Case: नारायण राणेंच्या गंभीर आरोपानंतर पोलिसांचं पुराव्यांसाठी आवाहन
खळबळजनक! कारागृहात कैद्याने गळफास लावून केली आत्महत्या
सुशांत राजपूत प्रकरणाच्या तपासासाठी मुंबईत आलेले बिहारचे पोलीस परतले; १२ जणांची केली चौकशी