गुड न्यूज! लवकरच महिला पोलिसांचे कामाचे तास १२ वरून ८ तास होणार 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2021 03:03 PM2021-09-24T15:03:47+5:302021-09-24T15:11:04+5:30

Good News of Maharashtra Police : राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी शुक्रवारी ही माहिती दिली.

Good news! The working hours of women police will be reduce from 12 to 8 hours | गुड न्यूज! लवकरच महिला पोलिसांचे कामाचे तास १२ वरून ८ तास होणार 

गुड न्यूज! लवकरच महिला पोलिसांचे कामाचे तास १२ वरून ८ तास होणार 

Next
ठळक मुद्देमहाराष्ट्र सरकारने महिला पोलिसांच्या कामाचे तास बारा तासांहून आठ तास करण्याचा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने महिला पोलिसांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील महिला पोलिसांच्या कामाचे तास १२ वरून ८ करण्यात येणार आहे. राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी शुक्रवारी ही माहिती दिली. 'एएनआय' या वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिले आहे.

सध्या पोलीस दलात कर्तव्य बजावणाऱ्या महिलांना १२ तास काम करावे लागत आहे. महिला पोलिसांना कामाबरोबरच कुटुंबाची जबाबदारी देखील पार पाडत तारेवरची कसरत करावी लागते. अनेक वेळा सणासुदीच्या दिवशी, बंदोबस्त, गंभीर गुन्हे यानिमित्ताने वर्षभरातून अनेक वेळा १२ तासापेक्षा जास्त कर्तव्य पोलिसांना बजवावे लागते. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाच्या जबाबदारीवर आणि कर्तव्यावर परिणाम होत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

महाराष्ट्र सरकारने महिला पोलिसांच्या कामाचे तास बारा तासांहून आठ तास करण्याचा निर्णय घेतला आहे. हा अतिशय चांगला निर्णय असून पोलीस दलासाठी एक खुशखबर आहे. यामुळे अनेक महिला पोलीस कर्मचाऱ्यांना कुटुंब आणि नोकरी यामध्ये चांगला असा ताळमेळ घालणं शक्य होणार आहे. हा निर्णय घेतल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्यासह संपूर्ण मंत्रीमंडळाचे मनापासून आभार', असे ट्वीट खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे.

Web Title: Good news! The working hours of women police will be reduce from 12 to 8 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app