शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

खुशखबर! पोलिसांना मिळणार लस्सीऐवजी पौष्टिक शिरा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 02, 2019 8:06 PM

अल्पोहार बदलाच्या प्रस्तावाला हिरवा कंदील

ठळक मुद्दे मुंबई पोलिसांच्या पथकाला आता या वर्षापासून पुरेसा अल्पोहार मिळणार आहे.गेल्यावर्षी २१ डिसेंबरला पाठविलेल्या प्रस्तावाला सामान्य प्रशासन विभागाने मंजुरी दिली आहे.लस्सी किंवा दुधाऐवजी त्यांना घनरुपात आहार म्हणून पायनेपल शिरा द्यावा, असा प्रस्ताव बनविला होता

जमीर काझीमुंबई - प्रजासत्ताक व महाराष्ट्र दिनी दादरमधील शिवाजी पार्कच्या मैदानावर सकाळपासून रखरखत्या उन्हामध्ये संचलन आणि कवायती करत उपस्थितांची मने जिंकणाऱ्या मुंबई पोलिसांच्या पथकाला आता या वर्षापासून पुरेसा अल्पोहार मिळणार आहे. त्यांना या दिवशी पौष्टिक पायनेपल शिरा व केळी दिली जाणार आहेत.अर्धपोटी असूनही कार्यक्रमाची रंगत वाढविण्यासाठी कडक गणवेषात आकर्षक कवायती करणाऱ्या जवानांना त्यामुळे काहीसा दिलासा मिळणार आहे. आतापर्यंत त्याची त्याबदल्यात केवळ दुध किंवा लस्सीवर बोळवण केली जात होती. मुंबईचे पोलीस आयुक्तांनी त्यांच्या अल्पोहार बदलाबाबत पाठविलेल्या प्रस्तावाला आता राज्य सरकारने हिरवा कंदील दाखविला आहे. त्यामुळे येत्या २६ जानेवारीपासून पोलिसांना हा अल्पोहार दिला जाणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.प्रजासत्ताक दिनी म्हणजे २६ जानेवारीला व महाराष्ट्र दिन म्हणजे १ मे दिवशी दरवर्षी शिवाजी पार्कवर होणाऱ्या शासकीय समारंभात मुंबई पोलिसांकडून चित्तथरारक संचलन केले जाते. त्यावेळी विविध विभागाचे चित्ररथ देखील साजरा केला जातो. राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणाऱ्या सोहळ्यामध्ये कोणतीही कमतरता राहू नये, यासाठी सशस्त्र दलातील जवानांकडून कित्येक दिवस आधीपासून तयारी केली जाता असते. कार्यक्रमाच्या चार दिवसांपूर्वी प्रत्यक्ष मैदानावर तीनवेळा तालीम तर पूर्वदिनी एकदा रंगीत तालीम घेतली जाते. त्यासाठी सकाळी साडेसहा वाजल्यापासून दुपारपर्यंत जवानांना हजेरी लावावी लागते. मैदानावर घाम घाळल्यानंतर जवानांना भूक लागली असताना त्यांना सरकारी खर्चात केवळ लस्सी किंवा दुध, बिस्कीट आणि दोन केळी दिली जात असत. त्यामुळे भूक भागत नसल्याने जवानांना स्वत:च्या खर्चाने बाहेर जाऊन खावे लागत असते. अल्पोहारावर केल्या जाणाऱ्या या अत्यल्प खर्चाबद्दल जवानांकडून ओरड होत होती. त्यामुळे सशस्त्र दलाच्या विभाग प्रमुखांनी लस्सी किंवा दुधाऐवजी त्यांना घनरुपात आहार म्हणून पायनेपल शिरा द्यावा, असा प्रस्ताव बनविला होता. पोलीस आयुक्त सुबोध जायसवाल यांनी तो मंजुरीकरीता महासंचालक कार्यालयाकरवी राज्य सरकारकडे पाठविला. गेल्यावर्षी २१ डिसेंबरला पाठविलेल्या प्रस्तावाला सामान्य प्रशासन विभागाने मंजुरी दिली आहे.नव्या निर्णयानुसार संचलन पथकातील प्रत्येक जवानाला यावर्षीच्या २६ जानेवारीला पायनापल शिरा आणि दोन केळी दिले जाणार आहे. मात्र, तयारी आणि रंगीत तालमीच्या चार दिवसासाठी पूर्वीप्रमाणेच लस्सी किंवा दुध, बिस्किट्स आणि दोन केळी दिली जाणार आहे. प्रजासत्ताक व महाराष्ट्र दिनानिमित्याने संचलन पथकाला द्यावयाच्या मोफत अल्पोहाराची सुविधा देण्याची जबाबदारी सशस्त्र विभागातील अप्पर आयुक्तांवर सोपविण्यात आली आहे. त्यासाठी त्यांनी शासकीय पुरवठादारांशी संपर्क करुन लस्सी व दुध आणि दर्जेदार शिरा उपलब्ध करण्याची व्यवस्था करावयाची आहे.  

टॅग्स :PoliceपोलिसMaharashtraमहाराष्ट्रRepublic Day 2018प्रजासत्ताक दिन २०१८Maharashtra Dayमहाराष्ट्र दिन