शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

कॅनरा बँकेतील सोन्यावर मारला डल्ला, ५३.२६ कोटींची चोरी; शाखा मॅनेजरच निघाला मुख्य सूत्रधार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 10:12 IST

Canara Bank Robbery: कर्नाटकातील कॅनरा बँकेच्या एका शाखेतून तब्बल ५३.२६ कोटी रुपयांची चोरी झाली होती. या प्रकरणात पोलिसांनी केलेल्या तपासात धक्कादायक खुलासा झाला.

Canara Bank Robbery news: बँकेवर इतका मोठा दरोडा पडला की रक्कम ऐकून पोलिसही चक्रावून गेले होते. तब्बल ५३.२६ कोटी रुपये बँकेतून लुटण्यात आले होते. यात रोख रक्कम फक्त पाच लाख होती. पण, चोरट्यांनी सोन्यावरच डल्ला मारला होता. बँकेच्या शाखेतून तब्बल ५९ किलो सोनंचोरीला गेलं होतं. मे महिन्यात कर्नाटकातील विजयपूर जिल्ह्यात ही घटना घडली होती. त्याचा तपास करताना अखेर खरा आरोपी शोधण्यात पोलिसांना यश आले. ५३.२६ कोटी लुटण्याच्या प्लॅनमधील मुख्य सूत्रधार बँक शाखेतील मॅनेजरच निघाला आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

कर्नाटक पोलिसांनी या प्रकरणामध्ये बँकेचा मॅनेजर विजयकुमार मिरियाल याच्यासह तीन जणांना अटक केली आहे. बँक मॅनेजरनेच लूट करण्याचा कट रचला आणि दागिने, पैसे चोरले. 

वाचा >>नोकरीचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीची विक्री करून परस्पर लावले लग्न, पित्याने घेतला गळफास

२३ ते २५ मे दरम्यान मणगुली गावातील कॅनरा बँकेच्या शाखेत ही चोरी झाली होती. आरोपींनी चोरी करताना पुरावे राहू नये म्हणून वीज पुरवठा खंडित केला. त्यानंतर सीसीटीव्ही यंत्रणेच्या ताराही कापल्या. आरोपींनी खिडकीला लावलेली जाळी बाजूला काढली आणि लॉकरमध्ये ठेवलेले सोने आणि पैसे घेऊन फरार झाले होते. 

अनेक महिन्यांपूर्वी बनवला होता कट

पोलिसांनी केलेल्या तपासातून अशी माहिती समोर आली की, बँकेतून पैसे-दागिने चोरी करण्याचा प्लॅन अतिशय सावधपणे तयार करण्यात आला होता.  विजयकुमारने बँकेतीलच सेवानिवृत्त कर्मचारी चंद्रशेखर नेरेला , तो आता ठेकेदार आहे आणि एक कसिनोही चालवतो. नेरेलाला या कटात सहभागी करून घेतले होते. 

पोलिसांनी श्वानांच्या मदतीने आरोपींचा माग काढण्याचा प्रयत्न केला. पण, आरोपींनी मिरची पावडर परिसरात पसरली होती, जेणेकरून श्वान माग काढू शकणार नाही. इतकंच नाही, तर आरोपींनी काळ्या जादूशी संबंधित काही सामानही तिथेच ठेवले होते. 

चोरी करण्यासाठी चित्रपट बघितले

ही चोरी करण्यापूर्वी आरोपींनी अनेक हॉलिवूड आणि बॉलिवूड सिनेमे बघितले. सगळे सिनेमे चोरी करण्याशी संबंधित होते. यात कोणते कपडे घालायचे, कोणते मास्क असले पाहिजे, हेल्मेटचा वापर कसा करायचा याबद्दलची माहिती चोरट्यांनी मिळवली होती. 

विजयपूरचे पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबर्गी यांनी सांगितले की, बँकेवर दरोडा टाकण्याची योजना अनेक महिन्यांपूर्वी तयार करण्यात आली होती. आरोपींनी बँक शाखा आणि परिसराची अनेकदा रेकी केली होती. आरोपी विजयकुमार हा ९ मे पर्यंत याच शाखेत मॅनेजर म्हणून काम करत होता. त्याची बदली रोनिहाल येथील शाखेत झाली होती. 

आरोपीने बँकेच्या लॉकरच्या डुप्लिकेट चाव्या आधीच बनवून घेतल्या होत्या. अनेकदा त्यांनी चाव्या वापरून बघितल्या. त्यातील एका चावीने लॉकर उघडले. त्यानंतर त्यांनी लूट करण्याचा प्लॅन सुरू केला. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीbankबँकGoldसोनंtheftचोरी