Ranya Rao : "शरीराला चिकटवलेलं सोनं झाकण्यासाठी विमानतळाच्या वॉशरूममधून टिश्यू रोल वापरला अन्..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2025 12:56 IST2025-03-14T12:54:13+5:302025-03-14T12:56:19+5:30

Ranya Rao : रान्याने १ मार्च २०२५ रोजी एका अनोळखी नंबरवरुन आलेल्या कॉलचा उल्लेख केला.

gold smuggling case actress Ranya Rao statement to dri gold at dubai airport used washroom to stuff at body | Ranya Rao : "शरीराला चिकटवलेलं सोनं झाकण्यासाठी विमानतळाच्या वॉशरूममधून टिश्यू रोल वापरला अन्..."

Ranya Rao : "शरीराला चिकटवलेलं सोनं झाकण्यासाठी विमानतळाच्या वॉशरूममधून टिश्यू रोल वापरला अन्..."

सोन्याच्या तस्करी प्रकरणात अडकलेल्या अभिनेत्री रान्या रावने महसूल गुप्तचर संचालनालयाला (DRI) सांगितलं की, तिला दोन पॅकेटमध्ये सोनं देण्यात आलं होतं. रान्याने १ मार्च २०२५ रोजी एका अनोळखी नंबरवरुन आलेल्या कॉलचा उल्लेख केला, ज्यामध्ये तिला दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल ३ वर सोनं घेण्याचे निर्देश देण्यात आले होते. तिने पुढे असा दावा केला की, फोन करणाऱ्याने तिला बंगळुरूमधील केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोनं पोहोचवण्यास सांगितलं होतं.

रान्या रावने डीआरआयला पुढे सांगितलं की, हे पॅकेट मिळाल्यानंतर ती डायनिंग लाउंजजवळील वॉशरूमकडे गेली. अज्ञात व्यक्तीकडून मिळालेले पॅकेट उघडल्यावर १२ सोन्याचे बार आढळले, जे प्रत्येकी चार वेगवेगळ्या पॅकमध्ये पॅक केले होते. सोन्याचे हे बार कंबरेला चिकटपट्टीने गुंडाळले होते. विमानतळाजवळील एका दुकानातून तिने चिकटपट्टी खरेदी केल्याचं सांगितलं. 

रान्याने अधिकाऱ्यांना असंही सांगितलं  तिने कात्री वापरून चिकटपट्टी एका विशिष्ट आकारात कापली होती आणि विमानतळाच्या आतमध्ये ती कात्री घेऊन जाऊ शकत नसल्याने ती आधीच तिच्या बॅगेत ठेवली होती. शरीराला चिकटवलेलं सोनं झाकण्यासाठी अभिनेत्रीने विमानतळाच्या वॉशरूममधून टिश्यू रोल वापरला. तिने असंही सांगितलं की, शूजमध्ये काही सोन्याचे बार ठेवले होते आणि उर्वरित तिच्या जीन्सच्या खिशात ठेवले होते. शरीरावर सोनं कसं गुंडाळायचं/लपवायचं हे समजून घेण्यासाठी रान्याने यूट्यूब व्हिडीओ पाहिले होते. न्यूज १८ हिंदीने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

युट्यूबवरुन शिकली सोनं लपवण्याची पद्धत; तस्करीची पहिलीच वेळ, रान्या रावचा मोठा खुलासा

रान्या रावने सांगितलं आहे की, तिने पहिल्यांदाच सोन्याची तस्करी केली होती आणि सोने लपवण्याची ही पद्धत तिने युट्यूबवरून शिकली होती. रान्याने महसूल गुप्तचर संचालनालयाला (DRI) दिलेल्या निवेदनात ही माहिती दिल्याचं सांगण्यात येत आहे. यावेळी अभिनेत्रीने तिच्या वारंवार होणाऱ्या परदेश दौऱ्यांबद्दल आणि सोन्याच्या तस्करीबद्दल सांगितलं. दुबईतून सोन्याची तस्करी करण्याची तिची ही पहिलीच वेळ होती. तसेच तिने यापूर्वी कधीही दुबईहूनसोनं खरेदी केलं नव्हतं. दुबईहून बंगळुरूला सोनं तस्करी करण्याची ही माझी पहिलीच वेळ होती असं म्हटलं आहे. 
 

Web Title: gold smuggling case actress Ranya Rao statement to dri gold at dubai airport used washroom to stuff at body

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.