तायक्वांडोमध्ये गोल्ड मेडल, Indian Idolमध्ये सहभाग; ३० गुन्हेही दाखल, आता पोलिसांनी ठोकल्या बेड्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2021 04:24 PM2021-09-27T16:24:10+5:302021-09-27T16:24:10+5:30

Crime News: उल्लेखनीय बाब म्हणजे हा आरोपी राष्ट्रीय स्तरावरील तायक्वांडोमधील सुवर्णपदक विजेता आहे. एवढेच नाही तर सदर आरोपीने इंडियन आयडॉल या स्पर्धेतही सहभाग घेतलेला होता.

Gold Medal in Taekwondo, Participation in Indian Idol; 30 cases filed, now arrest by police | तायक्वांडोमध्ये गोल्ड मेडल, Indian Idolमध्ये सहभाग; ३० गुन्हेही दाखल, आता पोलिसांनी ठोकल्या बेड्या 

तायक्वांडोमध्ये गोल्ड मेडल, Indian Idolमध्ये सहभाग; ३० गुन्हेही दाखल, आता पोलिसांनी ठोकल्या बेड्या 

Next

नवी दिल्ली - दिल्लीतील मोतीनगर पोलिसांनी एका अशा सराईत गुन्हेगाराला पकडे आहे ज्याच्या नावावर ३० गुन्हे दाखल आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे हा आरोपी राष्ट्रीय स्तरावरील तायक्वांडोमधील सुवर्णपदक विजेता आहे. एवढेच नाही तर सदर आरोपीने इंडियन आयडॉल या स्पर्धेतही सहभाग घेतलेला होता. (Gold Medal in Taekwondo, Participation in Indian Idol; 30 cases filed, now arrest by police)

दिल्ली पोलिसांचे एएसआय नरेंद्र आमि कॉन्स्टेबल राजेंद्र यांनी सूरज उर्फ फायटर नावाच्या या सराईताच्या मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून चोरीचे ५५ मोबाईल आणि एक पिस्तूल जप्त करण्यात आली आहे.पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये फायटरने मोबाईल फोन चोरल्याचे आणि सुमारे अडीच किलो सोने लुटल्याचे कबूल केले आहे. दिल्लीच्या विविध भागांमध्ये विशेषकरून पश्चिम, बाह्य, मध्य आणि उत्तर जिल्ह्यांमध्ये १०० हून अधिक स्नॅचिंग केल्याचे त्याने कबूल केले आहे. 

सूरज उर्फ फायटर गुप्ता दिल्लीतील उत्तमनगर येथील रहिवासी आहे. त्याचे वय २८ वर्षे आहे. त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यांमध्ये ३० हून अधिक गुन्हे दाखल आहेत.मिळालेल्या माहितीनुसार सूरजने अरबिंदो कॉलेज, दिल्ली विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेली आहे. त्याने तायक्वांडोमध्ये दोन वेळा राष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक मिळवले आहे. तसेच त्याने इंडियन आयडॉल सीझन ४ मध्ये सहभाग घेतला होता. तसेच त्यावेळी तो टॉप ५० स्पर्धकांमध्ये पोहोचला होता. 

Web Title: Gold Medal in Taekwondo, Participation in Indian Idol; 30 cases filed, now arrest by police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app