मंगला एक्स्प्रेसमधून 1.80 कोटींची सोन्याची बिस्कीटे व रोकड लंपास
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2018 19:44 IST2018-09-27T19:43:16+5:302018-09-27T19:44:00+5:30
मुंबईतील गोवंडी मधील शिवाजीनगर येथील प्रवासी यांची 1 कोटी 88 लाख रुपये किमतीची सोन्याची बिस्कीटे व रोख रक्कम चोरीला गेल्याची घटना घडली आहे.

मंगला एक्स्प्रेसमधून 1.80 कोटींची सोन्याची बिस्कीटे व रोकड लंपास
ठळक मुद्देशनिवारी मध्यरात्री 2.15 वाजण्याच्या सुमारास लंपास केल्या प्रकरणी महाड तालुका पोलीसांनी बुधवारी गुन्हा दाखल केला आहे.
जयंत धुळप, अलिबाग : मुबंई येथून निघून मंगला एक्स्प्रेस ट्रेनने मंगलोर कडे जाणारे मुंबईतील गोवंडी मधील शिवाजीनगर येथील प्रवासी यांची 1 कोटी 88 लाख रुपये किमतीची सोन्याची बिस्कीटे व रोख रक्कम चोरीला गेल्याची घटना घडली आहे. काळ्या रंगाची बँग चोरटय़ांनी शनिवारी मध्यरात्री 2.15 वाजण्याच्या सुमारास लंपास केल्या प्रकरणी महाड तालुका पोलीसांनी बुधवारी गुन्हा दाखल केला आहे.
मंगला एक्स्प्रेसने प्रवास करीत असताना फिर्यादी हे आपल्या बर्थवर ही बॅग ठेवून वाशरूमसाठी गेले असता चोरटय़ांनी ही बॅग लंपास केली आहे. या प्रकरणी महाड तालुका पोलीस ठाण्याचे पोलिस निरिक्षक एस.एस.कांबळे हे अधिक तपास करीत आहेत.