माहीममध्ये देव गेले चोरीला; भक्तांनी तक्रार करून केली चौकशी मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2021 02:30 PM2021-10-12T14:30:10+5:302021-10-12T14:31:22+5:30

God Stolen in Mahim : याविरोधात पोलिसात व धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार देखील करण्यात आली आहे.

God stolen in Mahim; Devotees complained and demanded an inquiry | माहीममध्ये देव गेले चोरीला; भक्तांनी तक्रार करून केली चौकशी मागणी

माहीममध्ये देव गेले चोरीला; भक्तांनी तक्रार करून केली चौकशी मागणी

googlenewsNext
ठळक मुद्देमाहीम येथे 'दादोबा जगन्नाथ रिलीजीअस ट्रस्ट' च्या माध्यमातून संचलित असलेलं हे मंदिर १७८३ साली नारायण दाजी मंत्री यांनी स्थापन केलं होतं.मुंबईमधल्या माहीममध्ये असलेल्या या काशी विश्वेश्वर मंदिराला आज २३८ वर्ष पूर्ण झाली आहेत

मुंबई -  मुंबईतील माहीमचं काशी विश्वेश्वर मंदिर म्हणजे भक्तांचं श्रद्धास्थान आहे. जागृत देवस्थान असल्यामुळे या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी असते. मुंबईमधल्या माहीममध्ये असलेल्या या काशी विश्वेश्वर मंदिराला आज २३८ वर्ष पूर्ण झाली आहेत. मात्र सध्या काशी विश्वेश्वराच्या भक्तांमध्ये संताप आहे.  कारण या मंदिरातल्या देवांच्या मूर्तीं, विश्वस्तांनी अपहार केल्याचा आरोप भक्तांकडून केला गेला आहे .याविरोधात पोलिसात व धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार देखील करण्यात आली आहे.


माहीम येथे 'दादोबा जगन्नाथ रिलीजीअस ट्रस्ट' च्या माध्यमातून संचलित असलेलं हे मंदिर १७८३ साली नारायण दाजी मंत्री यांनी स्थापन केलं होतं. मंदिरात काशी विश्वेश्वराचं शिवलिंग , माता पार्वती , माता शितलादेवी , क्रूरम देवता (कासव) आणि नंदी या पाच काळ्या पाषाणातल्या मूर्ती तेव्हा स्थापिलेल्या आहेत. त्यामुळे हे मंदिर पुरातन असल्यामुळे या मंदिराला "राज्य संरक्षित स्मारकाचा" दर्जा देण्यात आला आहे.


पण सध्या काशी विश्वेश्वराच्या भक्तांमध्ये संताप आहे , कारण या मंदिरातल्या देवांच्या मूर्तींचा विश्वस्तांनी अपहार केल्याचा आरोप भक्तांकडून केला जातोय . २०१३ साली मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला होता . तेव्हा जुन्या मूर्ती बदलून नव्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आलीय . या जुन्या मूर्ती २३८ वर्ष जुन्या आहेत . त्यामुळे या मूर्तीं पुरातन असून त्यांना ऐत्याहासिक आणि धार्मिक महत्व आहे . या मूर्ती बदलल्या पण जुन्या मूर्ती गायब केल्या म्हणत याविरोधात प्रसाद ठाकूर आणि काही भक्तांनी पोलिसात तक्रार नोंदवली  व धर्मादाय आयुक्तांकडून चौकशी सुरू आहे.


प्रकरण काय आहे ?

२०१३ साली काशी विश्वेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला होता , त्यावेळी जुन्या मूर्तीच्या जागी नव्या मूर्ती स्थापन करण्यात आल्या . मात्र जुन्या मूर्ती साधारणतः २३० वर्ष जुन्या असल्यामुळे प्रसाद ठाकूर या भक्ताने 'जुन्या मूर्ती कुठे आहेत ?' याशी विचारणा केली . पण तेव्हा या मूर्ती कुठे ठेवल्या आहेत , ते सांगण्यास विश्वस्तांनी नकार दिला . या मूर्ती पुरातन असल्यामुळे भाविकांची श्रद्धा होती , मूर्ती विसर्जित देखील करण्यात आल्या नव्हत्या . वा तसे पुरावे देखील विश्वसथांकडे नव्हते . त्यामुळे भक्तांनी याविषयी थेट पोलीस ठाणे गाठलं . तेव्हा पोलिसानी २५-०७-१९ रोजी पोलिसांनी धर्मादाय आयक्तांकडे चौकशीसाठी हे प्रकरण अग्रेशीत केलं , पुढे धर्मदाय उपायुक्तांनि याविषयी चौकशी करून विश्वस्त आणि तक्रारदारांना समक्ष बोलावून चौकशी केली होती . चौकशी केली असता दोन मूर्ती संस्थेचे ततत्कालीन अध्यक्ष गणपती गोविंद भत्ते यांच्या मालाड मध येथील वयक्तिक फार्महाऊस वर अवैधरित्या ठेवलेल्या सापडल्या , या मूर्ती ताब्यात घेऊ। धर्मादाय निरीक्षकांनी या प्रकरणाचा तपास करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते . यावेळी शोध लागलेल्या माता पार्वती आणि शीतल देवीच्या या २ मूर्तीचा पंचनामा केला असता या मूर्ती कुठेही भग्न वा जीर्णावसतेहत असल्याचा उल्लेख नसल्याचं समोर आलंय . त्यामुळे त्या बदलल्या का ? असा प्रश्न उपस्थित झालाय . तर इतर तीन मूर्ती आपण विसर्जित केल्याचं विश्वस्तनचं म्हणणं आहे . त्यामुळे पंचनाम्या दरम्यान विश्वसथांनी न्यायालयात खोटी कागदपत्र सादर केली असल्याच पंचनाम्याच्या अहवालात म्हटले आहे .

धर्मादाय आयुक्तांच्या अहवालात काय म्हटलंय?

- विश्वस्तांनी धर्मादाय आयुक्त कार्यालयात कासवाची मूर्ती पालटण्यात आली नसल्याची खोटी माहिती दिली.
- विश्वस्तांनी शिवलिंगाचे विसर्जन केल्याचे पुरावे, त्याचे छायाचित्र, विसर्जन केल्याचे ठिकाण, विसर्जनाचा दिवस, तसेच शिवलिंग विसर्जित करण्याचा ठराव यांविषयी कोणतीही माहिती सादर केलेली नाही.
- शिवलिंग विसर्जित केल्याची कोणतीही माहिती न दिल्यामुळे ‘शिवलिंग आणि कासवाची मूर्ती यांचे विसर्जन झाल्याचा संशय आहे.
- विश्वस्तांना सर्व मूर्ती एकत्रित विसर्जित करणे शक्य असतांना त्यांनी तसे का केले नाही ?
- मूर्ती २३६ वर्षे जुन्या असतांना त्या संग्रहालयात ठेवणे शक्य असतांना त्या मालाड येथे विश्वस्त गणपती भट्टे यांच्या ‘फार्म हाऊस’ येथे साधारण ८ वर्षे ठेवण्याचे प्रयोजन संशयास्पद आहे.
- विश्वस्तांनी इतिवृत्त नव्याने लिहून मूर्ती विसर्जनाचे दायित्व तत्कालीन पुजारी पुरुषोत्तमबुवा कुलकर्णी यांच्यावर ढकलण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येते.
- मूर्तींचे पंचनामे करतांना किंवा त्यानंतरही मूर्ती विसर्जनाविषयीचा ठराव विश्वस्तांनी सादर केला नाही.
- ८ जुलै २०२१ रोजी या अहवालावर धर्मदाय उपयुक्त यांनी आदेश देऊन की संसतेच्या विश्वसतंबी संपूर्ण प्रकरणात हलगर्जीपणा केल्याचं ठपका ठेवला आहे . आणि त्यांच्यावर "महाराष्ट्र सर्वानीक विश्वस्त व्यवस्था अधिनिय १९५०" कायद्यानुसार ४१/ड नुसार विश्वस्त बरखास्त करण्याची कारवाही सुरू केलीय , तसेच या अहवालात संस्थेच्या विश्वस्थांच्या कारभार  प्रशासक नेमण्याची शिफारस केलीय .


भक्तांचं म्हणणं काय?

प्रसाद ठाकूर भक्त आणि इतर तक्रारदार यांनी सांगितले की, हिंदू धर्माची विटंबना करणाऱ्या संस्थेच्या विषवस्थानावर कठोर कारवाही व्हायला हवी , आणि ज्या तीन मूर्ती गहाळ आहेत त्या मूर्ती पुन्हा मंदिरात यायला हव्यात .


प्रकरण न्यायप्रविष्ट असताना विश्वस्तांच म्हणणं काय?

हे प्रकरण धर्मादाय आयुक्तांकडे न्यायप्रविष्ट असताना त्यावर भाष्य करणे आम्हाला अडचणीचे ठरेल. असे करणे हे न्यायप्रक्रियेत अडथळा आणल्याचे मानले जाईल. तक्रारदाराने केलेल्या आरोपांवर आम्ही काहीही वक्तव्य देणे हे उचित नाही. "२०१३ साली पार पडलेल्या जीर्णोद्धाराचा प्रश्न २०१९ मध्ये का चर्चेला आला".


२३६ वर्षांपूर्वी येथे शिवलिंगाची प्रतिष्ठापना गाभाऱ्यात केली गेली. नंतर हळूहळू मंदिराचा विस्तार होऊन इतर मूर्त्यांची प्रतिष्ठापना केली गेली. त्यानंतर गेल्या २३६ वर्षात त्यातील मूर्त्या बदलल्या गेल्या किंवा नाही याची माहिती आमच्याकडे नाही. आणि जर फक्त शिवलिंग आणि दोन मूर्त्या बदलल्या. त्यापैकी दोन जुन्या मूर्त्या मंदिराच्या ताब्यात आहेत व जुने भग्न शिवलिंग विसर्जित करण्यात आले तर 'पाच मूर्त्या गायब' हे विधान अनाकलनीय आहे. तरीही हे प्रकरण धर्मादाय आयुक्तांकडे न्यायप्रविष्ट असताना आम्ही त्यावर आणखी भाष्य देऊ इच्छित नाही असे विश्वस्त यांच्याकडून सांगण्यात आले.

Web Title: God stolen in Mahim; Devotees complained and demanded an inquiry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.