The goat robber was arrested within two hours | एकाच्या हत्येप्रकरणी आरोपीला दोन तासांत अटक

एकाच्या हत्येप्रकरणी आरोपीला दोन तासांत अटक

ठळक मुद्देबकऱ्या चारणाऱ्या व्यक्तीचा गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आली. रात्री अंधार पडला तरीही घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेतला.

मोर्शी - तालुक्यातील गणेशपूर-पिंपरी येथील भीमसेन अमृत धुर्वे (६५) या बकऱ्या चारणाऱ्या व्यक्तीचा गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आली. बुधवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर काही तासांत आरोपीला अटक करण्यात आली. 

पिंपरी येथील रहिवासी भीमसेन धुर्वे व त्यांचे व्याही सोमाजी मलजी उईके (६०) हे दोघेही मंगळवारी सकाळी पिंपरी गावालगतच्या जंगलात गावातील बकऱ्या घेऊन चारण्याकरिता गेले होते. रात्री अंधार पडला तरीही घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेतला. परंतु, त्या दोघांचा शोध लागला नाही व बकऱ्याही दिसून आल्या नाही. त्यामुळे पिंपरी येथील पोलीस पाटील धनंजय पांडव व गावकऱ्यांनी मिळून सकाळी त्यांचा शोध घेतला. पिंपरी जंगलात भीमसेन धुर्वे याचे प्रेत आढळून आले. पोलीस अधीक्षक हरिबाला एन. यांच्या मार्गदर्शनात अप्पर पोलीस अधीक्षक श्या घुगे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक्षक सुनील किनगे तसेच मोर्शीचे पोलीस निरीक्षक संजय सोळंके यांच्या तत्परतेने पोलीस कर्मचारी मुलचंद बांबुरकर, संतोष मुंदाने, सुनील तिडके, संदीप लेकुरवाळे, अमित वानखडे, चेतन दुबे, सुनील मळासपुरे, सैयद, राजेंद्र काळे, युवराज नागमोते यांनी ही कारवाई केली.

Web Title: The goat robber was arrested within two hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.