Shocking! वडिलांनीच केली दोन बाळांची हत्या, लग्नाचं आमिष दाखवत दोन तरूणींशी ठेवले संबंध

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2021 12:07 PM2021-08-16T12:07:11+5:302021-08-16T12:09:07+5:30

आरोपी विवाहित असूनही त्याने दोन महिलांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं. त्या दोघींना त्याने लग्न करण्याचं आमिष दाखवलं होतं.

Goa : Father killed two newborns-promised two girls for wedding | Shocking! वडिलांनीच केली दोन बाळांची हत्या, लग्नाचं आमिष दाखवत दोन तरूणींशी ठेवले संबंध

Shocking! वडिलांनीच केली दोन बाळांची हत्या, लग्नाचं आमिष दाखवत दोन तरूणींशी ठेवले संबंध

Next

गोव्यातील (Goa) पणजीमधून (Panji) हत्येची एक खळबळजनक घटना समोर आली आहे. इथे एका व्यक्तीने कथितपणे आपल्या दोन नवजात बाळांची हत्या (Man Murders Two Newborns)  केली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे आणि त्याची चौकशी सुरू आहे. तसेच त्याच्या मृत बाळांचे मृतदेहही पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.

दोन तरूणींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं...

पोलिसांना तपासादरम्यान समजलं की आरोपी त्रिपाल नाईक ओडिशाच्या कालाहांडीचा राहणारा आहे. तो गोव्यात एका कन्स्ट्रक्शन साइटवर काम करत होता. तिथे त्याने दोन महिलांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं. या दोन्ंही महिला कन्स्ट्रक्शन साइटवर मजुरीचं काम करत होता. यातील एका महिलेचं वय ३० वर्षे तर दुसरीचं २२ वर्ष आहे. (हे पण वाचा : बाळाचं तोंड चिटकवून टाकलं; सतत रडत असल्याने आईने केले गंभीर कृत्य)

आरोपी विवाहित असूनही त्याने दोन महिलांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं. त्या दोघींना त्याने लग्न करण्याचं आमिष दाखवलं होतं. गेल्या जून महिन्यात त्याच्या पहिल्या प्रेयसीने एका बाळाला जन्म दिला. ज्याची हत्या आरोपीने आपल्या दुसऱ्या प्रेयसीसोबत मिळून केली.

दुसऱ्या बाळाची हत्या, कारण....

नंतर एका महिन्यांनी व्यक्तीच्या दुसऱ्या प्रे़यसीने एका बाळाला जन्म दिला. पण अजून त्यांचं लग्न झालेलं नव्हतं. दोघांना परत आपल्या गावी जायचं होतं. अशात  बदनामीच्या भीतीने व्यक्तीने आणि त्याच्या प्रेयसीने मिळून आपल्या बाळाचा जीव घेतला. आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून चौकशी दरम्यान त्याने आपला गुन्हा मान्य केला आहे.
 

Web Title: Goa : Father killed two newborns-promised two girls for wedding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.