बाळाचं तोंड चिटकवून टाकलं; सतत रडत असल्याने आईने केले गंभीर कृत्य

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2021 06:10 PM2021-08-15T18:10:59+5:302021-08-15T19:55:00+5:30

Stick Lips of child : सुदैवाने चिमुकल्याच्या वडिलांच्या वेळीच मुलाचे ओठ चिटकलेले  असल्याचं लक्षात आला आणि त्यांनी त्याला रुग्णालयात नेलं.

The woman was annoyed by her babys constant crying she glued sons lips | बाळाचं तोंड चिटकवून टाकलं; सतत रडत असल्याने आईने केले गंभीर कृत्य

बाळाचं तोंड चिटकवून टाकलं; सतत रडत असल्याने आईने केले गंभीर कृत्य

Next
ठळक मुद्देसुरुवातीला तो शांत व्हावा यासाठी मी खूप प्रयत्न केले. मात्र अखेरीस संतापाने मी त्याचं तोंड फेव्हिक्विकने चिकटवलं.डॉक्टरांनी उपचार करून त्या मुलाचे चिकटलेले ओठ मोकळे केले. हा मुलगा आता धोक्याबाहेर असून, त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.

प्रत्येक आईला आपलं प्रत्येक मूल प्रिय असतं. मुलांनी पालकांना कितीही त्रास दिला, तरी आई कधीही आपल्या मुलांसोबत अमानुषपणे वागत नाही. मात्र, अलीकडेच अशीच एक घटना बिहारमधल्या छपरा येथे घडली. येथे राहणारी एक महिला आपल्या चिमुकल्याच्या सततच्या रडण्याला वैतागली आणि तिने रागाच्या भरात आपल्या लहानग्याचं तोंड फेव्हिक्विकने चिकटवून टाकलं. या अमानुष घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली. एखादी आई असं दुष्कृत्य कसं काय करू शकते, यावर कोणाचाच विश्वास बसत नव्हता. सुदैवाने चिमुकल्याच्या वडिलांच्या वेळीच मुलाचे ओठ चिटकलेले  असल्याचं लक्षात आला आणि त्यांनी त्याला रुग्णालयात नेलं.

या प्रकरणातील महिलेने सांगितले की,  'मी मुलामुळे वैतागलेले. दूध पाजल्यानंतर, भरवल्यानंतरसुद्धा तो सतत रडत असे. रात्रीच्या वेळीदेखील याच्या रडण्यामुळे मला झोप लागत नसे. पती दिवसभर ऑफिसला जात असल्याने मी घरकाम आणि या मुलाचा सांभाळ करते. यामुळे मी दिवसभर थकून जात असे. तो सारखा रडत असल्याने मला त्याने चिडचिड होत होती. सुरुवातीला तो शांत व्हावा यासाठी मी खूप प्रयत्न केले. मात्र अखेरीस संतापाने मी त्याचं तोंड फेव्हिक्विकने चिकटवलं.'

या महिलेने बाळाचं तोंड चिकटवून टाकलं. त्यानंतर काही वेळाने तिचा पती घरी आला. त्यावेळी त्याला मुलाचा आवाज ऐकू आला नाही. त्यामुळे त्याला संशय आला. मुलाजवळ गेल्यानंतर त्याने जे दृश्य पाहिलं, त्यामुळे तो हादरून गेला. मुलाचे ओठ चिकटवलेले होते. मुलाच्या तोंडाला ग्ल्यू लावला असल्याचं या महिलेने खोटं सांगितले. मात्र, पतीने कठोरपणे चौकशी केली असता, या महिलेने संपूर्ण घटना सांगितली. त्यानंतर पतीने तात्काळ आपल्या मुलाला घेऊन रुग्णालयात गेला. मुलाची अवस्था पाहून डॉक्टरांनी आश्चर्य व्यक्त केले. मुलाच्या या अवस्थेला त्याची आई जबाबदार आहे, असे जेव्हा लोकांना माहिती झालं तेव्हा त्यांनीदेखील आश्चर्य व्यक्त केलं. त्यानंतर डॉक्टरांनी उपचार करून त्या मुलाचे चिकटलेले ओठ मोकळे केले. हा मुलगा आता धोक्याबाहेर असून, त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.

Web Title: The woman was annoyed by her babys constant crying she glued sons lips

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.