लघवी करायला दुसरीकडे जा! असं सांगितल्याने छातीत चाकू खुपसून एकाची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2021 22:06 IST2021-10-02T22:06:14+5:302021-10-02T22:06:59+5:30
Crime News :याप्रकरणी वडाळा टी. टी. पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लघवी करायला दुसरीकडे जा! असं सांगितल्याने छातीत चाकू खुपसून एकाची हत्या
मुंबई - वडाळा पूर्वेकडील पूर्व द्रुतगती मार्ग पुलाच्या खाली असलेल्या बगळा गार्डन नाल्याच्या बाजूला काल सायंकाळी एका इसमाचा क्षुल्लक कारणावरून हत्या करण्यात आली. याप्रकरणी वडाळा टी. टी. पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बगळा गार्डन नाल्याच्या बाजूला मोहम्मद अन्सारी आणि त्याचा मित्र राशीस अब्बूखान हे दोघे गप्पा मारत असताना आरोपी रफिक बसलेल्या ठिकाणीजवळ उभा राहून लघवी करू लागला त्यावेळी मोहम्मद रफिक अन्सारी याने त्यास दुसरीकडे जाऊन लघवी करण्यास सांगितले. त्याचा राग आल्याने आरोपीने रफिक अन्सारीला शिवीगाळ करून हाताने तोंडावर ठोसे मारले. नंतर गळा दाबून छातीत चाकू खुपसून त्याची हत्या केली.