The glory of an alleged German friend; Fearing a money laundering case, the woman cheated Rs 22 lakh | कथित जर्मन मित्राचा प्रताप; मनी लॉंड्रींगच्या केसची भीती घालून महिलेला २२ लाखाला फसवले 

कथित जर्मन मित्राचा प्रताप; मनी लॉंड्रींगच्या केसची भीती घालून महिलेला २२ लाखाला फसवले 

ठळक मुद्देभामट्याशी ऑनलाईन मैत्री करणे पडले महागात

औरंगाबाद: सोशल मिडियावर भेटलेल्या कथीत जर्मन मित्राने पाठवलेले गिफ्ट दिल्ली विमानतळावर आले असून यात युरो, डॉलर आणि सोने आहे, अवैध मार्गाने हा ऐवज आणल्यामुळे मनी लॉंड्रींगची केस होऊ शकते, अशी धमकी देउन १२ लाख रुपये आणि गिफ्ट सोडविण्यासाठी दंडाच्या नावाखाली १० लाख रुपये ऑनलाईन उकळून एका महिलेला तब्बल २२ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकारानंतर महिलेने सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली.

याविषयी प्राप्त माहिती अशी की, सिडको परिसरातील रहिवासी महिला पतीपासून विभक्त राहते. विरंगुळा म्हणून त्या सोशल मिडियावर सक्रीय असतात. काही महिन्यापूर्वी फेसबुक या सोशल मिडियावर त्यांची ओळख जर्मन व्यक्तीसोबत झाली. यादरम्यान त्यांच्यात ऑनलाईन मैत्री झाली आणि ते व्हॉट्सॲप वर चॅटिंग करू लागले. काही दिवसापूर्वी त्याने तिला एक गिफ्ट पाठवत असल्याचे सांगितले. ती नको म्हणत असतांना त्याने तिचा पत्ता विचारून गिफ्ट पाठवल्याचे सांगितले. 

चार दिवसानंतर एका महिलेने त्यांना फोन करून ती दिल्ली विमानतळ येथील कस्टम अधिकारी असल्याचे तिने सांगितले. तुमचे जर्मनीहून पार्सल आले असून त्यात युरो, डॉलर आणि सोने आहे. या वस्तू विनापरवानगी मागवल्याने तुमच्यावर मनी लॉंड्रिंग ची केस होवू शकते असे सांगितले. तक्रारदार यांनी विनवणी केल्यावर त्या महिलेने आणि अन्य आरोपीनी केस न करण्यासाठी लाच म्हणून तब्बल १२ लाख ऑनलाईन उकळले. यानंतर त्यांनी हे पार्सल सोडविण्यासाठी कस्टम ड्युटी(अबकारी कर ) म्हणून १० लाख रुपये ऑनलाईन बॅंक खात्यात पाठविण्यास सांगितले. कोट्यवधीचे गिफ्ट असल्यामुळे त्यांनी पुन्हा १० लाख रुपये ऑनलाईन पाठवले. नंतर त्यांना पुन्हा पैशाची मागणी होवू लागल्यामुळे त्यांना संशय आल्याने त्यांनी तिच्या जर्मन मित्राला कॉल केला असता त्याचा मोबाईल बंद होता. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली.

Web Title: The glory of an alleged German friend; Fearing a money laundering case, the woman cheated Rs 22 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.