तुझा फोन नंबर दे... १५ वर्षाच्या मुलीचा पकडला हात, गुन्हा दाखल

By रूपेश हेळवे | Updated: July 30, 2023 13:01 IST2023-07-30T12:33:52+5:302023-07-30T13:01:55+5:30

तरुणावर पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा

Give your phone number... 15-year-old girl's hand caught, case registered in solapur | तुझा फोन नंबर दे... १५ वर्षाच्या मुलीचा पकडला हात, गुन्हा दाखल

तुझा फोन नंबर दे... १५ वर्षाच्या मुलीचा पकडला हात, गुन्हा दाखल

रुपेश हेळवे

सोलापूर : पंधरा वर्षाच्या मुलीचा हात पकडून तिला तिचा मोबाईल नंबर मागितल्याप्रकरणी तरुणावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. अभिषेक कोळी ( रा. सोलापूर ) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे.

पीडित मुलगी ही पंधरा वर्षाची असून ती संगणकाच्या क्लासला गेली होती. ती जिन्यातून जात असताना आरोपी हा तिच्या जवळ आला. तिचा हात पकडून तुझा फोन नंबर मला दे, तू कोणत्या कॉलेजला ॲडमिशन केले आहे, ते मला सांग असे बोलून लज्जास्पद वर्तन केले. शिवाय तू जर कोणाला सांगितली तर तुझ्या घरच्यांना बघून घेईन अशी धमकी दिली, अशा आशयाची फिर्याद पीडितेने दिली आहे. या फिर्यादीवरून आरोपीवर गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा तपास पोलिस करत आहेत.

Web Title: Give your phone number... 15-year-old girl's hand caught, case registered in solapur