‘शरीरसुख दे... तुला वरिष्ठ अधिकारी बनवतो’

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2023 05:47 IST2023-12-21T05:47:41+5:302023-12-21T05:47:48+5:30

कैमूर (बिहार) : कैमूर जिल्ह्यात एका उपअधीक्षकाने महिला सब इन्स्पेक्टरचे लैंगिक शोषण केले आहे. पीडित  उपनिरीक्षकाने तिच्या तक्रारीत म्हटले ...

'Give body pleasure...makes you a senior officer' | ‘शरीरसुख दे... तुला वरिष्ठ अधिकारी बनवतो’

‘शरीरसुख दे... तुला वरिष्ठ अधिकारी बनवतो’

कैमूर (बिहार) : कैमूर जिल्ह्यात एका उपअधीक्षकाने महिला सब इन्स्पेक्टरचे लैंगिक शोषण केले आहे. पीडित  उपनिरीक्षकाने तिच्या तक्रारीत म्हटले की, आरोपी डीएसपी फैज अहमद खानने तिला एसएचओ बनवण्याचे आमिष दाखवून लैगिंक संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकला. आरोप सिद्ध झाल्यानंतर आरोपी डीएसपीला निलंबित करण्यात आले आहे.

महिला निरीक्षकाने सांगितले की, एसडीपीओ म्हणून तैनात खान तिला एसएचओ बनवण्याचे आमिष दाखवून लैंगिक संबंध ठेवण्यासाठी दबाव आणत होता. सुरुवातीला तिने याकडे लक्ष दिले नाही. मात्र त्यानंतर आरोपीने पीडितेला व्हॉट्सॲपवर अश्लील मेसेज पाठवण्यास सुरुवात केली. तो अनेकदा म्हणायचा, एकदा शरीरसुख दे, मी तुला वरिष्ठ अधिकारी बनवतो.  काही काळानंतर पीडित उपनिरीक्षकाची बदली झाली.

बदली झाल्यानंतरही डीएसपी महिला इन्स्पेक्टरचा छळ करत आणि अनैतिक संबंधासाठी दबाव टाकत असल्याचा आरोप आहे.  महिला निरीक्षकाची तक्रार गांभीर्याने घेत कैमूर जिल्हा पोलिस अधीक्षक ललित मोहन शर्मा यांनी चौकशी समिती स्थापन केली. अहवालात आरोप खरे असल्याचे आढळून आल्यानंतर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

Web Title: 'Give body pleasure...makes you a senior officer'