‘घटस्फोट दे, नाही तर व्हिडीओ  व्हायरल करतो’

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2024 08:27 IST2024-01-05T08:25:38+5:302024-01-05T08:27:24+5:30

याप्रकरणी संशयित पतीला अटक करण्यात आली आहे.

'Give a divorce, otherwise the video goes viral' | ‘घटस्फोट दे, नाही तर व्हिडीओ  व्हायरल करतो’

‘घटस्फोट दे, नाही तर व्हिडीओ  व्हायरल करतो’

बेळगाव : दुसऱ्या लग्नाची परवानगी द्यावी, यासाठी पत्नीसोबत एकांतात घालवलेल्या वैवाहिक खासगी क्षणांचे अश्लील फोटो काढून व व्हिडीओ तयार करून तिला ब्लॅकमेल करण्याचा प्रकार बेळगाव शहरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी संशयित पतीला अटक करण्यात आली आहे.

लग्नाला परवानगी दे अन्यथा तुझे माझ्यासोबतचे अश्लील व्हिडीओ आणि फोटो व्हायरल करतो, असे त्याने जेव्हा पहिल्यांदा धमकावले तेव्हा त्याच्या पत्नीला मोठा धक्काच बसला. त्यानंतर तिने अनेक वेळा आपल्या पतीची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. 

मात्र, त्याने आपला ब्लॅकमेलिंगचा प्रकार सुरूच ठेवल्यामुळे त्रस्त झालेल्या पत्नीने नाइलाजाने पोलिस ठाणे गाठले. तिने जिल्हा सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिस चौकशी आणि तपासात त्याच्या मोबाइलमध्ये त्याच्या पत्नीचे अश्लील व्हिडीओ आणि फोटो आढळून आले. परिणामी, पोलिसांनी संशयित आरोपीला तत्काळ अटक करून वैद्यकीय तपासणीनंतर न्यायालयात हजर केले असता त्याची हिंडलगा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
 

Web Title: 'Give a divorce, otherwise the video goes viral'