शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

पैशासाठी अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार; गर्ल्स स्कूल चौकीदारासह २ डॉक्टरही अटकेत

By प्रविण मरगळे | Published: January 15, 2021 8:58 AM

याबाबत शहर पोलीस निरीक्षक यशकांत सिंह म्हणाले की, सामूहिक बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी उप्रेता कुमार रसेल उर्फ छोटू नेपाळचा राहणारा आहे.

ठळक मुद्देमुलीने ज्या ज्या वेळी विरोध केला तेव्हा आरोपी छोटूने तिला मारहाण करून रुममध्येच बंद ठेवलंरुग्णालयात तिला उपचारासाठी नेलं असता मुलगी ५ महिन्याची गर्भवती असल्याचं कळालंपोलिसांनी तपास केला असता आरोपी छोटूची पत्नीही या गुन्ह्यात सहभागी असल्याचं समजलं

लखनौ – शहरात एका अल्पवयीन मुलीसोबत झालेल्या सामूहिक बलात्कारातील मुख्य आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या मुलीला नेपाळहून घेऊन येणारा गर्ल्स स्कूलचा चौकीदार आहे. शहर पोलिसांनी गुरुवारी चौकीदारासह ४ लोकांना अटक केली आहे. यात चौकीदाराने २ डॉक्टरांसह अन्य काही जणांची नावं पोलीस चौकशीत उघड केली ज्यांनी अल्पवयीन मुलीवर अत्याचार केले. पोलिसांनी या सर्व आरोपींना जेलमध्ये पाठवलं आहे.

याबाबत शहर पोलीस निरीक्षक यशकांत सिंह म्हणाले की, सामूहिक बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी उप्रेता कुमार रसेल उर्फ छोटू नेपाळचा राहणारा आहे. याशिवाय जुन्या शहरात राहणारा जीतू कश्यप, वरुण तिवारी आणि अलीगंज येथील पांडेय टोला रहिवासी अजय कुमार उर्फ बबली यादव यांना पोलिसांनी अटक केली आहे. मुख्य आरोपी छोटू एका गर्ल्स शाळेत चौकीदार होता, १३ महिन्यांपूर्वी या अल्पवयीन मुलीला काम देतो सांगून तिला लखनौ येथे आणलं, याठिकाणी गोमतीनगर परिसरात तिला भाड्याने रूम दिली.

आरोपी छोटू या मुलीला आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत होता. एकेदिवशी संधी मिळताच त्याने अल्पवयीन मुलीच्या चहामध्ये नशेचा पदार्थ मिसळला, ज्यामुळे ती मुलगी बेशुद्ध झाली. त्यानंतर आरोपीने मुलीवर बलात्कार केला त्याचसोबत या घटनेचा व्हिडीओ बनवला. शुद्धीत आल्यावर मुलीने विरोध केला असता त्याने व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत भीती दाखवली. दहशतीखाली आलेल्या मुलीने इज्जत जाईल यामुळेच शांत राहिली असं पोलिसांनी सांगितले.

तर मुलीने ज्या ज्या वेळी विरोध केला तेव्हा आरोपी छोटूने तिला मारहाण करून रुममध्येच बंद ठेवलं. २ दिवस ती रुममध्ये भुकेने व्याकूळ झाली. यानंतरही आरोपी शांत झाला नाही. त्याने आपल्या सहकाऱ्यांना रुमवर बोलावून त्यांच्याकडून पैसे घेऊन अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केले. वारंवार लैंगिक शोषणामुळे मुलगी गरोदर राहिली. त्यानंतर एकेदिवशी तिला रुममधून पळण्यात यश आलं. घरी पोहचताच मुलगी आजारी पडली. रुग्णालयात तिला उपचारासाठी नेलं असता मुलगी ५ महिन्याची गर्भवती असल्याचं कळालं. त्यानंतर घडलेला प्रकार मुलीने कुटुंबीयांना सांगितला त्यानंतर कुटुंबाने पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपींविरोधात तक्रार नोंदवली.

पोलिसांनी तपास केला असता आरोपी छोटूची पत्नीही या गुन्ह्यात सहभागी असल्याचं समजलं, मात्र आतापर्यंत ठोस पुरावा मिळू शकला नाही. तपास सुरू आहे. पत्नीविरोधात पुरावे मिळताच कठोर कारवाई करू, त्याचसोबत आरोपीने अनेक प्रतिष्ठीत लोकांचीही नावं घेतली आहे. त्यांचाही शोध पोलिसांकडून सुरु आहे. असं डीसीपी रईस अख्तर यांनी सांगितले.

टॅग्स :Rapeबलात्कारPoliceपोलिस