'तुझ्यासोबतच लग्न करणार' असं आश्वासन देऊन तरूणाने दुसरीशीच केलं लग्न आणि मग...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2022 15:55 IST2022-06-25T15:54:49+5:302022-06-25T15:55:18+5:30
Bihar Crime News : ज्या दिवशी सूरजचं लग्न झालं त्याच दिवशी ते त्याची हत्या करण्याचा प्लान करत होते. गुरूवारी संधी मिळताच मुलासोबत मिळून त्यांनी सूरजच्या डोक्यावर गोळी झाडली.

'तुझ्यासोबतच लग्न करणार' असं आश्वासन देऊन तरूणाने दुसरीशीच केलं लग्न आणि मग...
Bihar Crime News : बिहारची राजधानी पटणाच्या दानापूरमधन एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे लग्नाचं आश्वासन देणं प्रियकराला चांगलंच महागात पडलं. प्रेयसीच्या वडील आणि भावाने मिळून तरूणाची निर्दयीपणे हत्या केली. घटना फुलवारी शरीफच्या गोविंदपूर नोनिया टोलाची आहे.
असं सांगितलं जात आहे की, मृत सूरजचं एका तरूणीसोबत अफेअर होतं. त्याने तरूणीसोबत लग्न करण्याचं आश्वासन दिलं होतं. पण सूरजच्या कुटुंबियांना याची माहीत मिळताच त्यांनी त्याचं लग्न दुसऱ्या तरूणी करून दिलं. हे समजल्यावर सूरजच्या प्रेयसीचे वडील आणि भाऊ नाराज झाले. त्यांनी सूरजवर गोळी झाडून त्याची हत्या केली.
घटनेची सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी आरोप वडील-मुलाला ताब्यात घेतलं. चौकशी दरम्यान तरूणीच्या वडिलांनी सांगितलं की, सूरजने त्यांच्या मुलीसोबत लग्न करण्याचं आश्वासन दिलं होतं. सूरजने त्यांच्यासमोरही हे स्वीकारलं होतं. पण त्याच्या कुटुंबियांनी सूरजचं लग्न 15 दिवसांआधीच करून टाकलं.
मुलीचे वडील कन्हैयाने सांगितलं की, ज्या दिवशी सूरजचं लग्न झालं त्याच दिवशी ते त्याची हत्या करण्याचा प्लान करत होते. गुरूवारी संधी मिळताच मुलासोबत मिळून त्यांनी सूरजच्या डोक्यावर गोळी झाडली. पळून जाण्याचा प्रयत्न करत असतानाच लोकांनी त्यांना पकडलं आणि पोलिसांना बोलवलं. दोघांची चौकशी केली जात आहे.