WhatsApp वर गर्लफ्रेंडची अदलाबदल... स्विंगर्स रॅकेटचा पर्दाफाश; फोटोने करायचे ब्लॅकमेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2024 15:30 IST2024-12-21T15:29:31+5:302024-12-21T15:30:39+5:30

बंगळुरूमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. केंद्रीय गुन्हे शाखेने (सीसीबी) एका स्विंगर्स रॅकेटला पकडलं आहे.

girlfriend swapping on whatsapp bengaluru swingers racket busted victim claims they used blackmail | WhatsApp वर गर्लफ्रेंडची अदलाबदल... स्विंगर्स रॅकेटचा पर्दाफाश; फोटोने करायचे ब्लॅकमेल

फोटो - आजतक

बंगळुरूमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. केंद्रीय गुन्हे शाखेने (सीसीबी) एका स्विंगर्स रॅकेटला पकडलं आहे. हे रॅकेट जोडप्यांना पार्टनर स्वॅपिंगमध्ये अडकवायचे. याप्रकरणी एका महिलेने पोलिसांत तक्रार केल्यावर हा संपूर्ण धक्कादायक प्रकार उघडकीस आला. महिलेला यामध्ये सामील करण्याचा प्रयत्न करण्यात आला पण तिने नकार दिल्यावर तिला फोटोंच्या माध्यमातून ब्लॅकमेल करण्यात आलं. यानंतर पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय गुन्हे शाखेने (CCB) हरीश आणि हेमंत नावाच्या दोन आरोपींना बंगळुरूमध्ये अटक केली आहे. हे लोक पार्ट्यांच्या नावाखाली जोडप्यांना पार्टनर स्वॅपिंगमध्ये अडकवतात असा आरोप आहे. एका महिलेने सीसीबीकडे तक्रार केली होती की, तिला ओळखीच्या व्यक्तीसोबत आणि त्याच्या मित्रांसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडलं गेलं.

महिलेने याला विरोध केला असता आरोपीने तिचे खासगी फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. तक्रारीनंतर केंद्रीय गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास सुरू केला. याच दरम्यान टीमने अनेक महिलांचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडीओ जप्त केले, ज्याचा वापर ब्लॅकमेलिंगसाठी केला जात होता. महिलेचे एका आरोपीसोबत प्रेमसंबंध होते.

अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की आरोपी बंगळुरूच्या बाहेरील भागात व्हॉट्सॲप ग्रुप्सद्वारे पार्टीचं आयोजित करत असत. या पार्ट्यांमधून जोडप्यांना पार्टनर स्वॅपिंगमध्ये फसवलं गेलं. महिलेने तक्रारीत म्हटलं आहे की, आरोपीने तिच्या विश्वासाचा गैरफायदा घेतला. आरोपी तिला आणि इतर महिलांना शारीरिक संबंध ठेवण्यासाठी बळजबरी करत असे. फोटो आणि व्हिडीओ दाखवून धमक्या द्यायचा.

आरोपींनी महिलांना अडकवण्यासाठी आणि ब्लॅकमेल करण्यासाठी आक्षेपार्ह गोष्टींचा वापर केला. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू आहे. आरोपींनी आणखी किती महिलांना ब्लॅकमेल केलं आहे, याचाही शोध घेतला जात आहे. पोलिसांनी पुरावा म्हणून व्हिडीओ आणि फोटो ताब्यात घेतले आहेत. आरोपी स्विंगर्सच्या नावाने या पार्टी आयोजित करत असत. या प्रकरणातील अन्य संशयितांची भूमिकाही तपासण्यात येत आहे.
 

Web Title: girlfriend swapping on whatsapp bengaluru swingers racket busted victim claims they used blackmail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.