गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2025 19:32 IST2025-06-15T19:32:21+5:302025-06-15T19:32:58+5:30

अजय आणि त्याची प्रेयसी यांच्यात काही वाद झाल्यामुळे तिने त्याच्याशी बोलणे बंद केले होते. यामुळे अजय खूप मानसिक तणावाखाली होता.

Girlfriend stopped talking, boyfriend got angry; set himself on fire outside his girlfriend's house! | गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

प्रेमात आलेल्या निराशेमुळे टोकाचे पाऊल उचलल्याची एक धक्कादायक घटना मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर शहरात घडली आहे. एका २४ वर्षीय प्रियकराने आपल्या प्रेयसीच्या घरासमोरच स्वतःला पेटवून घेतले. या घटनेत प्रियकर गंभीररित्या भाजला असून, त्याची प्रकृती चिंताजनक आहे.

नेमके काय घडले?
अजय कुशवाह (२४) असे या प्रियकराचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अजय आणि त्याची प्रेयसी यांच्यात काही वाद झाल्यामुळे तिने त्याच्याशी बोलणे बंद केले होते. यामुळे अजय खूप मानसिक तणावाखाली होता. शनिवारी रात्री माधोगंज पोलीस स्टेशन हद्दीतील प्रीतम कॉलनी येथे, अजयने आपल्या प्रेयसीच्या घराबाहेर स्वतःवर पेट्रोल ओतून स्वतःला पेटवून घेतले.

शेजाऱ्यांनी वाचवले, पण...

अजयला आगीत जळताना पाहताच शेजाऱ्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून रुग्णवाहिका बोलावली आणि अजयला तातडीने रुग्णालयात दाखल केले. अजय सध्या रुग्णालयाच्या बर्न युनिटमध्ये असून, तो ७५ टक्के भाजला आहे. त्याची प्रकृती अजूनही गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अजय आगीत जळत असल्याचा व्हिडीओही समोर आला आहे, जो या घटनेची भीषणता दर्शवतो.

कौटुंबिक आरोप आणि पोलीस तपास

अजय हा सिकंदर कंपू येथील रहिवासी असून, तो फर्निचरचे काम करतो, तर त्याचे वडील भाजीपाला विकतात. अजयच्या वडिलांनी मात्र या घटनेमागे वेगळेच कारण असल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या मते, ती मुलगी लग्नाचे आमिष दाखवून अजयकडून पैसे उकळत होती. मुलीची पैशाची मागणी खूप वाढली होती आणि अजय ती पूर्ण करू शकत नसल्याने, त्याने हे टोकाचे पाऊल उचलले.

सध्या पोलीस या प्रकरणाला प्रेमप्रकरण म्हणून तपासत असून, घटनेच्या सर्व बाजू तपासल्या जात आहेत. अजयवर उपचार सुरू असून, त्याचे जबाब नोंदवल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल असे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Girlfriend stopped talking, boyfriend got angry; set himself on fire outside his girlfriend's house!