Girlfriend raped by her girlfriend during birthday party on Valentine's Day | व्हेलेंटाईन डेच्या पूर्वसंध्येला वाढदिवसाच्या पार्टीदरम्यान मैत्रिणीच्या प्रियकराने केला बलात्कार 
व्हेलेंटाईन डेच्या पूर्वसंध्येला वाढदिवसाच्या पार्टीदरम्यान मैत्रिणीच्या प्रियकराने केला बलात्कार 

ठळक मुद्दे. १३ फेब्रुवारीच्या रात्री नायगाव येथे मैत्रिणीच्या घरी मैत्रिणीच्या प्रियकराने तरुणीवर बलात्कार केला. वालीव पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक सरला काळे या याप्रकरणाचा तपास करत आहेत. 

वसई - २७ वर्षीय तरुणीचा १३ फेब्रुवारीला वाढदिवस होता. वाढदिवस साजरा करण्यासाठी ही तरुणी बोरिवलीहून नायगाव येथे एका बार अँड रेस्टॉरंटमध्ये मैत्रिणीसह तिच्या प्रियकरासोबत गेली होती. दरम्यान, तरुणीच्या वाईनमध्ये गुंगीचं औषध मिसळून मैत्रिणीच्या प्रियकराने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी वालीव पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक सरला काळे या याप्रकरणाचा तपास करत आहेत. 

१३ फेब्रुवारीच्या म्हणजेच व्हेलेंटाईन डेच्या पूर्वसंध्येला २७ वर्षीय तरुणी तिचा वाढदिवस साजरा करण्यासाठी बोरिवलीहून नायगाव येथे एका बार अँड रेस्टॉरंटमध्ये गेली होती. तेथे मैत्रीण आणि तिचा प्रियकर अगोदरपासूनच उपस्थित होते. मैत्रिणीच्या प्रियकराने वाईनमध्ये गुंगीचं औषध मिसळलं होतं. बारमध्ये मैत्रिणीसह पीडित तरुणी वाईन प्यायली होती तर मैत्रिणीचा प्रियकर बिअर प्यायला होता. वाढदिवस असलेली तरुणीच्या वाईनमध्ये ती येण्याआधीच प्रियकराने गुंगीचं औषध मिसळलं होतं. त्यानंतर दोघीजणी देखील नशेत असल्यामुळे पीडित तरुणीला तिच्या मैत्रिणीने आपल्या घरी राहण्याचा सल्ला दिला आणि ती घेऊन गेली. १३ फेब्रुवारीच्या रात्री नायगाव येथे मैत्रिणीच्या घरी मैत्रिणीच्या प्रियकराने तरुणीवर बलात्कार केला. याबाबत पीडित तरुणीने वालीव पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. 


Web Title: Girlfriend raped by her girlfriend during birthday party on Valentine's Day
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.