प्रियकराच्या मृत्यूनंतर प्रेयसीने उचललं धक्कादायक पाउल, घरातून बाहेर पडली आणि...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2023 11:27 IST2023-05-15T11:27:14+5:302023-05-15T11:27:44+5:30

Crime News : पोलिसांना मृतदेहाजवळ एक सुसाइड नोटही सापडली. ज्याच्या आधारावर पोलीस चौकशी करत आहेत. तरूणीचं मानसी असून ती गंगाघाट येथील राहणारी आहे.

Girlfriend end her life after boyfriends death tragic love story Unnao UP | प्रियकराच्या मृत्यूनंतर प्रेयसीने उचललं धक्कादायक पाउल, घरातून बाहेर पडली आणि...

प्रियकराच्या मृत्यूनंतर प्रेयसीने उचललं धक्कादायक पाउल, घरातून बाहेर पडली आणि...

Crime News : उत्तर प्रदेशतील उन्नावच्या गंगाघाट भागातील एका हॉटेलमध्ये एका तरूणीने गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं. तरूणी घरातून कानपूरला जाणार असल्याचं सांगून निघाली होती. पण संशयास्पद स्थितीत तिचा मृतदेह हॉटेलच्या रूममध्ये आढळून आला. पोलिसांना मृतदेहाजवळ एक सुसाइड नोटही सापडली. ज्याच्या आधारावर पोलीस चौकशी करत आहेत. तरूणीचं मानसी असून ती गंगाघाट येथील राहणारी आहे.

सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमला पाठवला. मृतदेहाजवळ सापडलेल्या सुसाइड नोटमध्ये तरूणीने आपल्या आई-वडिलांची माफी मागितली आहे. सुसाइड नोटनुसार, तरूणीच्या प्रियकराने 2 दिवसांआधीच आत्महत्या केली होती.

काय लिहिलं तरूणीने?

तरूणीने सुसाइड नोटमध्ये लिहिलं की, 'आई-बाबा मला माफ करा. मी तुमची चांगली  मुलगी बनू शकले नाही. मी विशाल दुबेवर खरं प्रेम केलं होतं. लग्नही केलं होतं आणि मी त्याच्या जवळ जात आहे. कधीच रडू नका. मी तुमच्याशी खोटं बोलून घरातून जात आहे. त्याच्यासारखा जगात मला कुणीही मिळणार नाही. माझ्या पतीला त्याच्या आईने मारलं. मी माझ्या मनाने जीवन संपवलं आहे. कुणाच्या दबावात येऊन नाही. मी विशालकडे जात आहे, मला माफ करा. तुम्ही चांगले  आई-बाबा आणि विशाल माझा चांगला पती होता. माझा भाऊ तुमच्यासोबत आहे. नेहमी आनंदी रहा....धन्यवाद'.

दरम्यान, मानसी एका फायनान्स कंपनीमध्ये काम करत होती. तिने ज्या हॉटेलमध्ये आत्महत्या केली, तेथील मॅनेजरने पोलिसांना आतून दरवाजा बंद असल्याची सूचना दिली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी दरवाजा तोडला तेव्हा त्यांना गळफास घेतलेली तरूणी दिसली. तरूणीची मृत्यू झाला होता. पोलीस पुढील चौकशी करत आहेत.

Web Title: Girlfriend end her life after boyfriends death tragic love story Unnao UP