Girlfriend doesn't pay Rs 2,000, boyfriend throws sanitizer on her face and burns | प्रेयसीने २ हजार रुपये दिले नाही, प्रियकराने तिच्या चेहऱ्यावर सॅनिटायझर फेेकून जाळले

प्रेयसीने २ हजार रुपये दिले नाही, प्रियकराने तिच्या चेहऱ्यावर सॅनिटायझर फेेकून जाळले

ठळक मुद्देप्रेयसीने 2 हजार रुपये देण्यास नकार दिल्यामुळे प्रियकराने संतापाच्या भरात प्रेयसीच्या चेहऱ्यावर सॅनिटायझर फेकले. ६ आणि ७ जुलैच्या रात्री ही धक्कादायक घटना घडली. पीडित तरुणी २० टक्के भाजली असून ती मूळची शिलाँग येथील आहे.

कोरोनाच्या लढाई संपूर्ण जगात सॅनिटायझरचा वापर मोठ्या प्रमाणावर आपण करत आहोत. मात्र, चंदिगडमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका २२ वर्षीय तरुणीला तिच्या प्रियकराने चेहऱ्यावर सॅनिटाइजर फेकून जाळल्याची घटना घडली आहे. 

 

प्रेयसीने 2 हजार रुपये देण्यास नकार दिल्यामुळे प्रियकराने संतापाच्या भरात प्रेयसीच्या चेहऱ्यावर सॅनिटायझर फेकले. त्यानंतर पीडित तरुणीला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी आरोपी प्रियकराला अटक केली आहे.
 

६ आणि ७ जुलैच्या रात्री ही धक्कादायक घटना घडली. पीडित तरुणी २० टक्के भाजली असून ती मूळची शिलाँग येथील आहे. नरेश नावाच्या आरोपीने तरुणीकडे 2 हजार रुपये उसण्यगि स्वरूपात मागितले होते. मात्र, तिने पैसे देण्यास नकार दिला. यामुळे संतापातून त्याने तिच्यावर चेहऱ्यावर सॅनिटायझर फेकले आणि आपल्याकडील लायटरने तिला पेटवले. नंतर शेजाऱ्यांनी पीडित मुलीला हॉस्पिटलमध्ये दाखल केले. ही तरुणी डिसेंबरमध्ये पहिल्यांदा चंदिगडला आली, त्यानंतर नरेशसोबत तिची मैत्री झाली आणि दोघेजण लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहात होते.

तो सारखा तिच्याकडे पैश्याची मागणी करत पैशांवरुन मारहाण करायचा अशी माहिती पीडित तरुणीने पोलिसांना दिली.रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर या प्रकरणी पीडित तरुणीने प्रियकर नरेशविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी भा. दं. वि. कलम ३४२, ३२४ आणि ५०६ नुसार गुन्हा दाखल केला. यानंतर पोलिसांनी नरेशला शनिवारी अटक केली.

Web Title: Girlfriend doesn't pay Rs 2,000, boyfriend throws sanitizer on her face and burns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.