जीवघेणं प्रेम! मैत्रिणीशी करायचं होतं लग्न; मुलगा होण्यासाठी 'ती' तांत्रिकाकडे गेली, झालं भयंकर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2023 10:16 IST2023-06-21T09:59:44+5:302023-06-21T10:16:14+5:30

दोन महिन्यांपूर्वी नातेवाईकांनी मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती.

girl went to tantrik for became boy gender change lgbtq story want marriage with girl | जीवघेणं प्रेम! मैत्रिणीशी करायचं होतं लग्न; मुलगा होण्यासाठी 'ती' तांत्रिकाकडे गेली, झालं भयंकर...

फोटो - आजतक

उत्तर प्रदेशातील शाहजहांपूरमध्ये एका तरुणीचे तिच्या मैत्रिणीसोबत समलैंगिक संबंध होते, तिला तिच्याशी लग्न करायचं होतं. ती जेंडर बदलण्यासाठी (मुलगा होण्यासाठी) तांत्रिकाकडे गेली.धक्कादायक बाब म्हणजे तांत्रिकाने मुलीची हत्या केली. दोन महिन्यांपूर्वी नातेवाईकांनी मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. आता मुलीचा सांगाडा सापडल्यानंतर पोलिसांनी तपास करत तांत्रिक आणि मुलीच्या मैत्रिणीला अटक केली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. 

आरसी मिशन परिसरात राहणारी पूनम 18 एप्रिल रोजी घरातून बेपत्ता झाली होती. 26 एप्रिल रोजी त्याच्या भावाने पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली. तेव्हापासून पोलीस तरुणीचा शोध घेत होते. तपासादरम्यान पोलिसांना कळलं की, मुलीला शाहजहांपूरमधील पुवायां येथे राहणारी तिची मैत्रीण प्रीती हिच्याशी लग्न करायचं होतं. यानंतर, रविवारी, 18 मे रोजी लखीमपूरच्या तहसील मोहम्मदी येथून एका मुलीचा सांगाडा सापडला. पोलिसांनी तपास केला असता हा सांगाडा पूनमचा असल्याचे निष्पन्न झाले.

पोलिसांचे म्हणणे आहे की, पूनमचे ​​पुवायां येथील प्रीतीसोबत समलैंगिक संबंध होते, तिला लग्न करायचं होतं. पूनम मुलाच्या स्टाईलमध्ये राहायची. पूनममुळे प्रीतीचं लग्न तुटलं होतं. यानंतर प्रीतीची आई उर्मिलाने लखीमपूर खेरी येथील मोहम्मदी तहसीलमधील रहिवासी रामनिवास यांच्याशी संपर्क साधला. रामनिवास हा व्यवसायाने गवंडी आहे, पण तो तांत्रिकाचं काम देखील करतो. पूनमला प्रीतीच्या मार्गातून हटवण्याच्या बदल्यात रामनिवासला दीड लाख रुपये देण्याचं ठरलं होतं. 

रामनिवासने प्रीती आणि पूनमला जवळच्या जंगलात बोलावलं. तेथे त्याने दोघींचे लग्न लावणार असल्याचं सांगितलं. तंत्रविद्येने मी तुला मुलीतून मुलगा बनवतो, असं त्याने पूनमला सांगितले. यानंतर रामनिवासने पूनमला पुन्हा जंगलात बोलावलं, तेथे त्याने पूनमवर तंत्रमंत्र केले आणि संधी मिळताच तिच्यावर सतत वार करून तिची हत्या केली. यानंतर मृतदेह जंगलातील झुडपात लपवून ठेवण्यात आला. पूनमचा भाऊ परमिंदर याने पूनमचे ​​कपडे पाहून ओळख पटवली. रामनिवास, प्रीती आणि तिची आई उर्मिला यांनी आपल्या बहिणीची हत्या केल्याचा आरोप परविंदरने केला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

कोणता राजकीय पक्ष येत्या काळात महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर पुढे घेऊन जाऊ शकतो, असं तुम्हाला वाटतं?

भाजपा (29005 votes)
शिवसेना (3598 votes)
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (28422 votes)
काँग्रेस (7048 votes)
राष्ट्रवादी काँग्रेस (9798 votes)
महाराष्ट्र नवनिर्माण सेना (11906 votes)
वंचित बहुजन आघाडी (11579 votes)
आम आदमी पार्टी (3454 votes)
भारत राष्ट्र समिती (2029 votes)
अन्य (1492 votes)

Total Votes: 108331

VOTEBack to voteView Results

Web Title: girl went to tantrik for became boy gender change lgbtq story want marriage with girl