तरूणीने होणाऱ्या पतीला बोलवलं, म्हणाली - डोळे बंद कर सरप्राइज देते अन् त्याच्यावर चाकूने केला हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2022 13:07 IST2022-04-20T11:12:24+5:302022-04-20T13:07:28+5:30
(Andhra Pradesh Crime News : भेटीदरम्यान तरूणीने तरूणाला सरप्राइज देते सांगून डोळे बंद करण्यास सांगितलं आणि चाकूने त्याच्या गळ्यावर वार केला.

तरूणीने होणाऱ्या पतीला बोलवलं, म्हणाली - डोळे बंद कर सरप्राइज देते अन् त्याच्यावर चाकूने केला हल्ला
आंध्र प्रदेशच्या (Andhra Pradesh) विशाखापट्टनममधून एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. इथे एका तरूणीने तिच्या होणाऱ्या नवऱ्याच्या हत्येचा प्रयत्न केला. आई-वडिलांनी मुलीच्या लग्नासाठी एक मुलगा निवडला होता, जो तरूणीला पसंत नव्हता. मग तिने तरूणाला भेटायला बोलवलं. भेटीदरम्यान तरूणीने तरूणाला सरप्राइज देते सांगून डोळे बंद करण्यास सांगितलं आणि चाकूने त्याच्या गळ्यावर वार केला. ज्यात तो गंभीरपणे जखमी झाला. हॉस्पिटलमध्ये तो मृत्यू आणि जीवनाशी लढत आहे.
ही घटना विशाखापट्टनमच्या चोडावरममध्ये घडली. पोलिसांनी सांगितलं की, जखमी रामू नायडू आणि पुष्पाचं पुढील महिन्यात लग्न होणार होतं. २२ वर्षीय पुष्पाने शाळा सोडली होती. तर रामू नायडू हैद्राबादच्या मध्ये मोठ्या पदावर नोकरीवर आहे. रामूला पुष्पासोबत लग्नासाठी तिच्या आई-वडिलांनी निवडलं होतं. दोघांचा साखरपुडा झाला होता आणि २० मे रोजी दोघांचं लग्न होणार होतं. पण पुष्पाला हे लग्न करायचं नव्हतं. तिने या लग्नासाठी आई-वडिलांना नकारही दिला होता. पण कुटुंबिय तिच्यावर दबाव टाकत होते.
रामू नायडू सोमवारी होणारी पत्नी पुष्पाला भेटायला अनकापल्लीला आला होता. इथे त्यांनी आधी शॉपिंग केली मग साई बाबा आश्रमाच्या डोंगरावर गेले. यानंतर तरूणीने होणाऱ्या नवऱ्याला सरप्राइज देणार म्हणून डोळे बंद करण्यास सांगितलं आणि तिने त्याच्या डोळ्यावर पट्टी बांधली. त्यानंतर पुष्पाने त्याच्या गळ्यावर चाकूने वार केला. ज्यात तो गंभीर जखमी झाला. हे प्रकरण समोर आल्यावर तरूणीने रामू जखमी झाल्याची खोटी कहाणी पोलिसांना सांगितली. तिने सांगितलं की, तो बाइकवरून पडला. पण नंतर रामूने पोलिसांना पूर्ण घटनेची माहिती दिली.
महिलेने पोलिसांना सांगितलं की, तिला नायडूसोबत लग्न करायचं नव्हतं. हा मुलगा तिच्या आई-वडिलांनी पसंत केला होता. ती म्हणाला की, तिने या लग्नाला विरोध केला होता. पण तिचे आई-वडील काहीही ऐकायला तयार नव्हते. मग तिने बाजारातून चाकू विकत घेतला आणि रामूवर जीवघेणा हल्ला केला.