रेल्वे पुलावर विद्यार्थिनीची छेड, सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपीचा शोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2023 08:02 IST2023-11-05T08:02:08+5:302023-11-05T08:02:35+5:30

याप्रकरणी तिने बोरीवली रेल्वे पोलिसांकडे तक्रार केल्यावर अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Girl student molested on railway bridge, search for accused by checking CCTV footage | रेल्वे पुलावर विद्यार्थिनीची छेड, सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपीचा शोध

रेल्वे पुलावर विद्यार्थिनीची छेड, सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपीचा शोध

मुंबई : बोरीवली रेल्वे स्थानकावरील फूटओव्हर ब्रिजवर एका अज्ञात व्यक्तीने २४ वर्षीय विद्यार्थिनीकडे पाहत अश्लील चाळे केले. याप्रकरणी तिने बोरीवली रेल्वे पोलिसांकडे तक्रार केल्यावर अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही विद्यार्थिनी दक्षिण मुंबईतील एका संस्थेत शिकते. सकाळी ७ च्या सुमारास तिने बोरीवली स्थानकावरील येण्यासाठी फलाट क्रमांक ३ वर एफओबीवरून चालायला सुरुवात केली. ती सकाळी लवकर असल्याने पुलावर फारशी गर्दी नव्हती. ती पुलावर उभ्या असलेल्या एका अनोळखी माणसाच्या जवळून जात असताना, त्याने अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली. हा प्रकार पाहून विद्यार्थिनी घाबरली आणि तिथून पटकन निघून गेली.

अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल
  सकाळी कॉलेजमध्ये जाण्याची घाई असल्याने तिने परतल्यावर संध्याकाळीच बोरीवली रेल्वे पोलिसांकडे संपर्क साधला. 
  त्यानुसार अश्लील हावभाव केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
  त्यानुसार पोलिस आता पुलावरील सीसीटीव्ही फुटेज तपासून छेड काढणाऱ्याचा शोध घेत आहेत.

Web Title: Girl student molested on railway bridge, search for accused by checking CCTV footage