इन्स्टाग्रामवर तरुणीशी मैत्री अन् हॉटेलमध्ये नेऊन केला बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2020 19:10 IST2020-02-01T19:00:47+5:302020-02-01T19:10:02+5:30

उत्तर प्रदेशमधल्या आग्रा शहरात धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Girl raped on Instagram in a friendship and hotel | इन्स्टाग्रामवर तरुणीशी मैत्री अन् हॉटेलमध्ये नेऊन केला बलात्कार

इन्स्टाग्रामवर तरुणीशी मैत्री अन् हॉटेलमध्ये नेऊन केला बलात्कार

आग्राः उत्तर प्रदेशमधल्या आग्रा शहरात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका तरुणीबरोबर पहिल्यांना त्यानं इन्स्टाग्रामवर मैत्री केली. मैत्री केल्यानंतर तो तिला एका हॉटेलमध्ये घेऊन गेला अन् वोडका प्यायला दिला. त्यानंतर तिच्या बलात्कार केला आहे. तरुणानं तरुणीला मादक द्रव्य देऊन तिच्यावर बलात्कार केला असून, तिच्या गुप्तांगाला जखम झाल्याची खूणही सापडली आहे.  

आग्र्यातील ताजगंज ठाणे क्षेत्रात ही घटना घडली आहेत. पीडित तरुणीचं वय 20 वर्षं आहे. ती अजूनही महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. तर आरोपी आग्र्यातील एका संस्थेत एव्हिएशनचा डिप्लोमा करत आहे. आरोपी हाथरस जिल्ह्यातील रहिवासी आहे. त्याची ओळख 23 वर्षीय दर्श गौतमच्या नावानं झाली आहे. सद्यस्थितीत तो आपल्या कुटुंबीयांसह आग्र्यातील एका भागात राहतो.  

आग्र्याचे एसएसपी बबलू कुमार यांची माहिती देताना सांगितलं की, पीडिता आणि आरोपी एक महिन्यापासून सोशल मीडियावरच्या इन्स्टाग्रावर मित्र आहेत. इन्स्टाग्रामवरून त्यांचं एकमेकांशी अनेकदा बोलणं होत होतं. दोघांनीही भेटण्याची योजना तयार केली. तो तरुण तिला ताजगंज हॉटेलमध्ये घेऊन गेला आणि तिच्यावर त्यानं बलात्कार केला, असा आरोप पीडितेनं केला आहे. पोलीस हॉटेलच्या जवळपासची सीसीटीव्ही फुटेज तपासत आहे. त्यात तरुण आणि तरुणी ताजगंजमधल्या हॉटेलमध्ये जाताना दिसत आहे. जिथे पीडितेवर अत्याचार करण्यात आला. मला एक ड्रिंक दिलं, त्यानंतर मी बेशुद्ध झाले.

तासाभरानं जेव्हा जाग आली, तेव्हा प्रायव्हेट पार्टला जखम झाल्याचं निदर्शनास आलं. पोलिसांच्या माहितीनुसार, तरुणीला तपासणीसाठी एका खासगी रुग्णालयात पाठवण्यात आलं होतं. तिथून तिच्या मैत्रिणी तिला एसएन मेडिकल कॉलेजला घेऊन गेल्या. पोलिसांनी आरोपीला अलिगडमधून अटक केली आहे. आरोपी तीन मित्रांबरोबर लग्न समारंभात जात होता. त्याचदरम्यान पोलिसांनी त्याला अटक केली. आरोपीनं गुन्हा कबूल केला आहे. पोलिसांनी त्याचे तीन मित्र आणि हॉटेल कर्मचाऱ्याला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. 

Web Title: Girl raped on Instagram in a friendship and hotel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.