शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
4
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
5
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
6
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
7
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
8
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
9
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
10
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
11
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
12
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
13
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
14
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
15
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
16
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
17
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
18
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
19
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
20
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक

बापाच्या अय्याशीमुळे चिमुरडीचा बळी; कर्जाच्या ओझ्यामुळे उचलले पाऊल, कुटुंब उद्ध्वस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2022 13:12 IST

बापाच्या नात्याला काळिमा फासणारे कृत्य करत एक हसरा खेळता जीव घेतानाच त्याने व त्याच्या पत्नीने स्वतःचे कुटुंबच उद्ध्वस्त केले.

मीरा भाईंदर :

वसईचा स्टिफन ब्राको (वय ३७) आणि पूनम (वय ३०) हे सुशिक्षित दाम्पत्य. त्यांची मुलगी अनायका (वय ७) ही गोडगोजिरी व कोणालाही लळा लावेल अशी; पण डान्स बार, ऑर्केस्ट्रा बारसह अय्याशीच्या व्यसनात बेधुंद बुडालेल्या स्टिफनने कर्जाच्या ओझ्याखाली पोटच्या मुलीची हत्या केली. बापाच्या नात्याला काळिमा फासणारे कृत्य करत एक हसरा खेळता जीव घेतानाच त्याने व त्याच्या पत्नीने स्वतःचे कुटुंबच उद्ध्वस्त केले.

३० मे रोजीच्या दुपारी २ वाजता काशीमीरा पोलिसांना सिझन लॉजमधून फोन आली की, खोलीतील एक महिला ‘वाचवा, वाचवा’ म्हणून ओरडत होती. डुप्लिकेट चावीने दार उघडले असता ती बेशुद्ध अवस्थेत होती.  तर, तिची मुलगी निपचित पडलेली होती व तोंडातून रक्त येत होते, डोळे बाहेर आले होते. तिचा बाप सकाळीच निघून गेला होता. सहायक पोलीस निरीक्षक सुदर्शन पोतदार हे पथकासह घटनास्थळी दाखल होताच त्यांना हे प्रकरण गंभीर असल्याचे समजले. पोलिसांनी रुग्णवाहिका बोलावली असता त्यातील डॉक्टरांनी अनायकाचा मृत्यू झाल्याचे सांगितले. तर, पूनम हिला भाईंदरच्या भीमसेन जोशी रुग्णालयात दाखल केले. पोतदार यांनी वरिष्ठांना कळवताच सहायक पोलीस आयुक्त विलास सानप, काशीमीरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजय हजारे आदी घटनास्थळी दाखल झाले.

२७ मे रोजी स्टिफन, पूनम, अनायका लॉजमध्ये राहायला आले. संपूर्ण कुटुंब असल्याने लॉजवाल्यांनाही संशय आला नाही. ३० मे रोजी स्टिफन सकाळी १०.३० वाजता निघून गेला. अत्यवस्थ असलेल्या पूनमकडून थोडीफार माहिती पोलिसांना मिळाली. लॉजमधील तिघांच्या ओळखपत्रावरून त्यांची ओळख पटली. मग पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. ३१ मे रोजी स्टिफन मीरा रोड स्थानकासमोरील एका लॉजमध्येच सापडला. पूनम आणि स्टिफन यांच्या चौकशीत धक्कादायक खुलासे झाल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMira Bhayanderमीरा-भाईंदर