भावाच्या मित्रावर ती करत होती प्रेम, तो तिला भेटायला घरी आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2022 15:08 IST2022-11-28T15:08:04+5:302022-11-28T15:08:15+5:30

Crime News : प्रेयसी मंजली कुमारीने पोलिसांना सांगितलं की, तिचा भाऊ आनंद मोहन आणि अभिषेक आधीपासून मित्र होते. ज्यामुळे दोघांचं एकमेकांच्या घरात येणं-जाणं होतं.

Girl brother killed her lover with axe burnt clothes destroy evidence in Bihar | भावाच्या मित्रावर ती करत होती प्रेम, तो तिला भेटायला घरी आणि मग...

भावाच्या मित्रावर ती करत होती प्रेम, तो तिला भेटायला घरी आणि मग...

Crime News : बिहारच्या मोतिहारीमध्ये एका तरूणाची कुऱ्हाडीने कापून हत्या करण्यात आली आहे. असं सांगितलं जातं आहे की, तरूण त्याच्या प्रेयसीला भेटण्यासाठी तिच्या घरी गेला होता. आरोपीने पुरावे मिटवण्यासाठी मृतकाचे कपडे जाळले आणि मृतदेह दूर फेकून फरार झाला. पण या घटनेनंतर प्रेयसीने हिंमत दाखवली आणि प्रियकराच्या कुटुंबियांसोबत पोलिसांनी सगळी घटना सांगितली. तिने तिच्या भावांवर हत्येचा गुन्हा दाखल केला.

ही घटना दिलावरपूरमधील आहे. इथे एक प्रियकर त्याच्या प्रेयसीला भेटण्यासाठी तिच्या घरी गेला होता. प्रेयसीच्या छोट्या भावाने दोघांना बोलताना बघितलं. त्याने हे त्याच्या मोठ्या भावाला सांगितलं. मोठा भाऊ तिथे आला आणि दोन्ही भावांनी बहिणीच्या प्रियकराला मारहाण सुरू केली. त्यांना अडवण्यासाठी आलेल्या प्रेयसी आणि तिच्या आजीलाही दोघांनी मारहाण केली. त्यानंतर प्रियकराला एका रूममध्ये बंद करून कुऱ्हाडीने वार करत त्याची हत्या केली.

प्रेयसी मंजली कुमारीने पोलिसांना सांगितलं की, तिचा भाऊ आनंद मोहन आणि अभिषेक आधीपासून मित्र होते. ज्यामुळे दोघांचं एकमेकांच्या घरात येणं-जाणं होतं. यादरम्यान दोघे प्रेमात पडले. 25 नोव्हेंबरला तिच्या गावात वरात आली होती. ज्यात अभिषेकही आला होता. अभिषेक तिला भेटण्यासाठी तिच्या घरी आला आणि दोघांना तिचा लहान भाऊ छोटूने बघितलं. त्यानंतर मोठा भाऊ तिथे आला आणि दोघांनी मिळून अभिषेकची हत्या केली. त्यानंतर त्याचे कपडे काढून जाळले आणि त्याचा मृतदेह फेकून दिला.

याबाबत एसपी डॉ. कुमार आशीष यांनी सांगितलं की, मृतक मुजफ्परफूर जिल्ह्यातील साहेबरगंज भागातील धोला पातील राहणारा आहे. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. आरोपी भावांचा शोध पोलीस घेत आहेत. त्यांना लवकरच अटक केली जाईल.
 

Web Title: Girl brother killed her lover with axe burnt clothes destroy evidence in Bihar