उल्हासनगरातील पेट्रोल पंपावरील मुलीला मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2020 18:36 IST2020-02-20T18:34:03+5:302020-02-20T18:36:08+5:30
गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू

उल्हासनगरातील पेट्रोल पंपावरील मुलीला मारहाण
उल्हासनगर - पेट्रोल भरताना मोबाईल बंद ठेवा असे सुचविताच राग आलेल्या तरुणाने पेट्रोल भरणाऱ्या तरुणीला अश्लील शिवीगाळ करून मारहाण केली. शिवजयंतीदिवशी भारत पेट्रोल पंपावर रात्री 9 वाजता घटना घडली असून याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
उल्हासनगर कॅम्प नं-४ येथील भारत पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्याचे काम मुली करतात. बुधवारी रात्री 9 वाजण्याच्या दरम्यान एक तरुण पेट्रोल भरण्यासाठी आला होता. गाडीत पेट्रोल भरताना तरुण मोबाईलचा वापर करीत होता. त्यावेळी पेट्रोल भरणाऱ्या तरुणीने पेट्रोल भरतांना मोबाईल बंद ठेवा, असे विनंतीपूर्वक सुचविले. याचा राग तरुणाला येऊन त्याने तरुणीच्या कानाखाली मारून अश्लील शिवीगाळ केली.
याप्रकाराने खळबळ उडून पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांनी तरुणाला समज दिली. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात तरुणाविरोधात गुन्हा दाखल झाला असून पोलीस तरुणाचा शोध घेत आहेत. भारत पेट्रोल पंपावर तरुण मुली काम करीत असून यापूर्वीही पंपावरील कर्मचाऱ्यांना मारहाण झाल्याच्या घटना घडल्या आहेत.