अरे देवा! प्रियकराच्या नादात पत्नीने घेतला पतीचा जीव, ब्लेडने सपासप केले ४०-५० वार....

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2021 16:41 IST2021-06-07T16:39:17+5:302021-06-07T16:41:05+5:30

Crime News : पत्नीनं आपल्याच पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना आली समोर. दोन वर्षांपूर्वी महिलेची झाली होती एका व्यक्तीशी ओळख.

giridhi crime wife conspired to kill husband brutally murdered with blade delhi police arrested | अरे देवा! प्रियकराच्या नादात पत्नीने घेतला पतीचा जीव, ब्लेडने सपासप केले ४०-५० वार....

अरे देवा! प्रियकराच्या नादात पत्नीने घेतला पतीचा जीव, ब्लेडने सपासप केले ४०-५० वार....

ठळक मुद्देपत्नीनं आपल्याच पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना आली समोर. दोन वर्षांपूर्वी महिलेची झाली होती एका व्यक्तीशी ओळख.

दिल्लीतील निहाल विहारमध्ये एका महिलेनं आपल्या पतीची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये गिरिडीह या ठिकाणी राहणारा एका आरोपीदेखील सामील आहे. गिरिडीह पोलिसांच्या मदतीनं दिल्लीपोलिसांनी आरोपीला अटक करत बेड्या ठोकल्या.

दिल्लीतील निहाल विहार पोलिसांनी हत्येमध्ये सामील असलेला मुख्य आरोपी मोहम्मद अस्लम याला अटक केली आहे. मोहम्मद अस्लम यानं चौकशीदरम्यान आपला गुन्हा कबुल केला आहे. "अनिल साहू आपली पत्नी आणि दोन मुलांसह दिल्लीतील निहाल विहारमध्ये एका भाड्याच्या घरात राहत होते. तसंच ते प्लेसमेंट जॉब करत होते." असं आरोपीनं पोलिसांना सांगितलं. २ जून रोजी अनिल साहू यांच्या पत्नीनं पोलिसांना फोन करुन त्यांची हत्या झाल्याची माहिती दिली होती. 

अनिल साहू यांच्या चेहऱ्यावर आणि मानेवर जवळपास ४० ते ५० पेक्षा अधिकवेळा ब्लेडने वार केले होते. तर त्यांच्या पत्तीचे कपडेही रक्तानं माखले होते. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या चौकशीत महिलेनं आपल्या प्रियकराच्या मदतीनं पतीची हत्या केल्याची कबुली दिली. या माहितीनंतर पोलिसांनी अस्लम याचा शोध घेण्यास सुरूवात केली. 

मिळालेल्या माहितीनुसार अस्लम हा दिल्लीतील अन्य ठिकाणी राहून काम करत होता. २०१९ मध्ये त्या महिलेची अस्लम याच्याशी ओळख झाली होती. त्यानंतर दोघांमध्ये संभाषणास सुरूवात झाली आणि त्याचं रुपांतर प्रेमात झालं. यानंतर ते दोघं एकमेकांना भेटत होते. याचदरम्यान दोघांनी मिळून हत्येचा कट रचला होता. 

 

Web Title: giridhi crime wife conspired to kill husband brutally murdered with blade delhi police arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.